World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पाचव्या दिवसाचे पहिले सत्र भारताच्या नावावर राहिले. मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami ) न्यूझीलंडला दोन मोठे धक्के दिले आणि त्यात इशांत शर्मानंही हात साफ करून घेतला. या दोघांनी पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेताना किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी केली आहे. न्यूझीलंडचा संघ अजूनही ८२ धावांनी पिछाडीवर आहे आणि कर्णधार केन विलियम्सनवर त्यांची मदार आहे. दरम्यान, किवींना धक्का देणाऱ्या शमीची एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे आणि सोशल मीडियावर त्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे महिला प्रेक्षकांसमोर त्यानं ही कृती केली आहे... Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today
जसप्रीत बुमराहनं केली एक चूक; पहिलं षटक टाकताच ड्रेसिंग रूमच्या दिशेनं पळत सुटला
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी किवी सलामीवीरांना माघारी पाठवले. केन विलियम्सन व रॉस टेलर ही जोडी बचावात्मक खेळ करून भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहत होती. पण, पाचव्या दिवशी मोहम्मद शमीनं किवींना धक्का दिला. त्यानं रॉस टेलरला ( ११) बाद केले. कव्हरवर उभ्या असलेल्या शुबमन गिलनं हवेत झेपावत झेल टिपला अन् टेलरला माघारी जाण्यास भाग पाडले. IND vs NZ World Test Championship,WTC Final Today
किवींना बसले धक्के, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलची फ्लाईंग कॅच, Video