World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पाचव्या दिवसाची पहिली सत्र मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami ) नावावर राहिली. शमीनं अप्रतिम गोलंदाजी करून न्यूझीलंडला ४ धक्के दिले. भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यातील चुरस वाढू लागली आहे. शमी व इशांत यांनी पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेताना किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रातही शमीनं करिष्मा दाखवला. पिछाडी भरून काढण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमण करण्याचा पवित्रा घेतला, परंतु शमीनं सुरेखरित्या त्यांना धक्के दिले. कर्णधार केन विलियम्सन एका बाजूनं संयमी खेळ करत विकेट टिकवून होता. त्याची विकेट मिळेपर्यंत किवींनी पहिल्या डावात आघाडी घेतली होती.
भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी दिली. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी त्यांना माघारी पाठवले. केन विलियम्सन व रॉस टेलर ही जोडी बचावात्मक खेळ करून भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहत होती. पण, पाचव्या दिवशी मोहम्मद शमीनं किवींना धक्का दिला. त्यानं रॉस टेलरला ( ११) बाद केले. कव्हरवर उभ्या असलेल्या शुबमन गिलनं हवेत झेपावत झेल टिपला अन् टेलरला माघारी जाण्यास भाग पाडले. केन व टेलर यांनी ८८ चेंडूंत १६ धावांची भागीदारी केली. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today
त्यानंतर आलेल्या हेन्री निकोल्सला ( ७) इशांत शर्मानं रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. शमीने पुढच्या षटकात किवींना आणखी एक धक्का दिला अन् बीजे वॉटलिंगचा त्रिफळा उडवला. कॉलिन डी ग्रँडहोम ( १३) व कायले जेमिन्सन ( २१) यांनी पिछाडी भरून काढण्यासाठी झटपट धावा केल्या. पण, त्यांनाही शमीनं माघारी पाठवले. किवींचा निम्मा संघ माघारी परतला तेव्हा ते ८२ धावांनी पिछाडीवर होते अन् सातवी विकेट पडेपर्यंत ही पिछाडी २५ धावांपर्यंत कमी झाली होती. केन एका बाजूनं खेळपट्टीवर तग धरून होता अन् त्यानं तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेत अर्धशतकी भागीदारी केली. त्याच्या याच खेळीमुळे किवींनी पहिल्या डावात आघाडीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. केननं १७७ चेंडूंत ६ चौकारांसह ४९ धावा केल्या. इशांत शर्मानं त्याची विकेट घेतली.
मोहम्मद शमीचा विक्रम
आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये चार विकेट्स घेणारा शमी हा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. यापूर्वी १९८३च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. ( Previous best: Mohinder Amarnath’s 3/12 in 1983 WC final.)
Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Mohammad Shami creat history, but Kane Williamson 49 runs give New Zealand lead in first innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.