World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही अर्धा तास उशीरानं सुरू झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनं लंच ब्रेकपर्यंत 4 धक्के दिले. विराट कोहली, रिषभ पंत यांच्यानंतर अजिंक्य रहाणेवर सामन्याची मदार होती, परंतु किवी गोलंदाज निल वॅगनरनं त्याचा पोपट केला. सुरुवातीला दोन शॉर्ट बॉल टाकून अजिंक्यला त्यानं संभ्रमात टाकले अऩ् चौथ्या चेंडूवरील शॉर्ट बॉलचा वेग संथ ठेवला व अजिंक्यला चूकीचा फटका मारण्यास भाग पाडले. स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या टॉम लॅथमनं सोपा झेल घेतला. WTC Final 2021, WTC Final 2021
आयपीएलमध्ये RCBकडून खेळणाऱ्या कायले जेमिन्सननं टीम इंडियाला हा धक्का दिला. त्यानं विराटला 44 धावांवर पायचीत केलं अन् टीम इंडियाला कालच्या धावसंख्येत 3 धावांचीच भर घालता आली आहे. विराटनं DRS घेतला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जेमिन्सननं कंजूस गोलंदाजी कायम राखताना रिषभ पंतवर दडपण निर्माण केलं. त्याला 22 चेंडूंत 4 धावाच करता आल्या. जेमिन्सनच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा रिषभचा प्रयत्न फसला अन् स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टॉम लॅथमनं सुरेख झेल टिपला. Ind vs NZ Test Final, WTC final 2021
अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा होत्या, परंतु घातकी फटका मारून तो 49 धावांवर माघारी परतला. आर अश्विननं फटाफट 22 धावा केल्या, परंतु तोही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतानं 7 विकेट्स गमावत 211 धावा केल्या आहेत. अजिंक्य 117 चेंडूंत 5 चौकारांसह 49 धावांवर बाद झाला. WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today
Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Neil Wagner STRIKES, Ajinkya Rahane falls straight into New Zealand's trap, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.