World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कडवी टक्कर देऊनही केवळ चौकार कमी म्हणून न्यूझीलंडला जेतेपद नाकारण्यात आले होते. पण, यावेळी केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली किवी संघानं जेतेपद हिस्कावून घेतलं जाईल, अशी एकही संधी ना प्रतिस्पर्धी टीम इंडियाला दिली ना आयसीसीला... जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं दमदार कामगिरी करताना विराट कोहली अँड टीमला चारी मुंड्या चीत केलं. उत्तम कर्णधार कसा असावा हे केन विलियम्सननं पुन्हा एकदा त्याच्या नेतृत्व कौशल्यानं दाखवून दिलं. उजवा हात दुखत असतानाही तो खेळपट्टीवर संघाच्या विजयासाठी खिंड लढवत राहिला. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकण्याची संधी टीम इंडियानं खऱ्या अर्थानं गमावली. त्यात एका अतिरिक्त जलदगती गोलंदाजाची उणीव टीम इंडियाला दोन्ही डावांत जाणवली. WTC Finalचे दोन दिवस पावसानं वाया गेल्यानंतर सहाव्या दिवशीही पावसाचा अंदाज होता, परंतु इंग्लंडच्या हवामानाचा लहरीपणानं सर्वांना आश्चर्यचकीत केलं. विराट व चेतेश्वर खेळपट्टीवर असेपर्यंत टीम इंडिया फ्रंटसिटवर होती, पण कायले जेमिन्सननं पहिल्या सत्रात टीम इंडियाला जोरदार धक्के दिले. त्यातून त्यांना सावरणे अवघड झाले. रिषभ पंतकडून गॅबा कसोटीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा होती, परंतु त्याला यावेळी अपयश आले. न्यूझीलंडनं भारताचा दुसरा डाव १७० धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताला फक्त १३९ धावांचे माफक लक्ष्य ठेवता आले. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today
संक्षिप्त धावफलक - भारत ( पहिला डाव) - २१७ ( अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४, रोहित शर्मा ३४; कायले जेमिन्सन ५-३१) व ( दुसरा डाव) - १७० ( रिषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टीम साऊदी ४-४८, ट्रेंट बोल्ट ३-३९) पराभूत वि. न्यूझीलंड ( पहिला डाव) - २४९ ( डेव्हॉन कॉनवे ५४, केन विलियम्सन ४९, टीम साऊदी ३०; मोहम्मद शमी ४-७६, इशांत शर्मा ३-४८) व ( दुसरा डाव) - २ बाद १४० ( केन विलियम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७, आर अश्विन २-१७)
विराट कोहलीसा आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांत अपयश2017 - Champions Trophy: Final (Lost)2019 - ODI World Cup: Semi-Final (Lost)2021 - World Test Championship: Final (Lost)