WTC Final 2021 IND vs NZ : इथे सुरूय फायनल मॅच अन् आर अश्विननं निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : साऊदॅम्प्टन येथील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर गडगडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 07:15 PM2021-06-20T19:15:20+5:302021-06-20T19:17:06+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Ravichandran Ashwin reveals when he plans to retire from cricket | WTC Final 2021 IND vs NZ : इथे सुरूय फायनल मॅच अन् आर अश्विननं निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा!

WTC Final 2021 IND vs NZ : इथे सुरूय फायनल मॅच अन् आर अश्विननं निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : साऊदॅम्प्टन येथील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर गडगडला. 3 बाद 146 धावांवरून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करणाऱ्या टीम इंडियाचे 7 फलंदाज अवघ्या 71 धावांत न्यूझीलंडनं माघारी पाठवले. कायले जेमिन्सननं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ अडचणीत सापडलेला दिसत असताना प्रमुख फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं त्याच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली.

प्रतिस्पर्धींमुळे मला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते असे अश्विननं सांगितले आणि स्वतःच्या खेळात सुधारणा करण्याची इच्छा जेव्हा गमावून बसेन, तेव्हा खेळणं सोडेन, असे अश्विननं सांगितले.तो म्हणाला, सतत सुधारणा करणे, याच दृष्टीकोनामुळे मी कारकिर्दीत यश मिळवल आहे. त्या बाबतीत कोणतीच तडजोड मी केली नाही. खेळात सुधारणा करत राहण्याचा माझा प्रयत्न सुरूच असतो. त्यामुळे नवीन काही करण्याची इच्छाच जेव्हा संपेल, तेव्हा मी खेळणं सोडून देईन.   

34 वर्षीय गोलंदाजानं कसोटी क्रिकेटमध्ये 409 विकेट्स घेतले आहेत. त्याला कोणत्याच वादात अडकायला आवडत नाही, तो फक्त आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करून खेळतो. तो म्हणाला, मला संघर्ष करायला मजा येते आणि याच कारणामुळे मी यश मिळवलं आहे. 


अश्विननं 78 कसोटींत 409 विकेट्स घेतल्या आहेत आणि 5 शतकं व 11 अर्धशतकांसह त्याच्या नावावर 2656 धावाही आहेत. वन डे क्रिकेटमध्ये 111 सामन्यांत 150 विकेट्स व 675 धावा त्यानं केल्या आहेत. 46 ट्वेंटी-20त 52 विकेट्सही त्यानं घेतल्या आहेत. 
 

 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Ravichandran Ashwin reveals when he plans to retire from cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.