World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पाचव्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मद शमीनं न्यूझीलंडला चार धक्के देत संपूर्ण डावच पलटवला. पण, केन विलियम्सनच्या चिवट खेळीनं अन् टीम साऊदीच्या फटकेबाजीनं किवींनी पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली. भारताने सलामीची विकेट लगेच गमावली असली तरी रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारानं टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. टीम साऊदीनं ही जोडी तोडली. पाचव्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर होते. WTC Final 2021, WTC Final 2021
थंडीनं कुडकुडत होता विराट कोहली अन् रोहित शर्मानं उडवली खिल्ली, पाहा मजेशीर Video
मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami ) WTC Final चा पाचवा दिवस गाजवला. त्यानं चार विकेट्स घेत किवींना मोठे धक्के दिले, परंतु कर्णधार केन विलियम्सनच्या संयमासमोर टीम इंडियाची कसोटी पाहिली. केननं १७७ चेंडूंचा सामना करताना ६ चौकारांसह ४९ धावा केल्याच शिवाय त्यानं तळाच्या पाच फलंदाजांसह धावसंख्येत जवळपास १०० धावांची भर घातली. ५ बाद १३५ धावांवरून न्यूझीलंडनं पहिल्या डावात २४९ धावा केल्या. टीम साऊदीनं ४६ चेंडूंत ३० धावा करताना न्यूझीलंडची आघाडी ३२ धावांपर्यंत नेली. शमीनं चार, इशांतनं तीन व आर अश्विननं दोन विकेट्स घेतल्या. WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today
भारताचा पहिला डाव २१७ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडनं २४९ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी दिली. त्यानंतर केन विलियम्सन व टीम साऊदी यांनी दमदार खेळ केला. कॉलिन डी ग्रँडहोम ( १३) व कायले जेमिन्सन ( २१) यांनी पिछाडी भरून काढण्यासाठी झटपट धावा केल्या. पण, त्यांनाही शमीनं माघारी पाठवले. पाचव्या दिवसाचे पहिलेच षटक टाकणाऱ्या आर अश्विननं किवींना ९वा झटका दिला. रवींद्र जडेजानं किवींच्या दहाव्या फलंदाजाला माघारी पाठवले. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
रोहित व चेतेश्वर यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, साऊदीनं पुन्हा एकदा महत्त्वाची विकेट घेतली. त्यानं रोहितला ( ३०) पायचीत केलं. रोहितला सर्वाधिक १० वेळा बाद करण्याचा पराक्रम अँजेलो मॅथ्यूजनंतर साऊदीनं केला. भारतानं दिवसअखेर २ बाद ६४ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली आहे. IND vs NZ World Test Championship,WTC Final Today