World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप जेतेपदाच्या हुकलेल्या संधीच्या जखमा सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंड संघानं बुधवारी साऊदॅम्प्टनवर इतिहास रचला. न्यूझीलंडने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या डावात २४९ धावा केल्या. टीम इंडियाला दुसऱ्या डावात १७० धावाच करता आल्या अन् किवींनी १३९ धावांचे लक्ष्य सहज पार केले. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसत नाही.. जाणून घेऊयात स्पर्धेतील आकडेवारी...
सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज ( Top 5 Highest Run Scorers)मार्नस लाबुशेन ( ऑस्ट्रेलिया) - १३ सामने, ७८.८२ची सरासरी, १६७५ धावा, १००/५० - ५/९जो रूट ( इंग्लंड) -२० सामने, ४७.४३ ची सरासरी, १६६० धावा, १००/५० - ३/८स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया) - १३ सामने , ६३.८५ची सरासरी, १३४१ धावा, १००/५० - ४/७बेन स्टोक्स ( इंग्लंड) - १७ सामने, ४६ ची सरासरी, १३३४ धावा, १००/५० - ४/६अजिंक्य रहाणे ( भारत) - १८ सामने, ४२.९२ ची सरासरी, ११७४ धावा, १००/५० - ३/६
सर्वाधिक विकेट्स ( Most Wickets)आर अश्विन ( भारत) - १४ सामने, ७१ विकेट्स, ७ -१४५ सर्वोत्तम कामगिरीपॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया) - १४ सामने, ७० विकेट्स, ५-२८ सर्वोत्तम कामगिरीस्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड) - १७ सामने, ६९ विकेट्स, ६-३१ सर्वोत्तम कामगिरीटीम साऊदी ( न्यूझीलंड ) - ११ सामने, ५६ विकेट्स, ५-३२ सर्वोत्तम कामगिरीनॅथन लियॉन ( ऑस्ट्रेलिया) - १४ सामने, ५६ विकेट्स, ६-४९ सर्वोत्तम कामगिरी
सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ( Highest individual score)डेव्हिड वॉर्नर ( ऑस्ट्रेलिया ) - ३३५* धावा, ४१८ चेंडू, ३९ चौकार व १ षटकार वि. पाकिस्तान, अॅडलेडझॅक क्रॅवली ( इंग्लंड) - २६७ धावा, ३९३ चेंडू, ३४ चौकार व १ षटकार वि. पाकिस्तान, साऊदॅम्प्टनविराट कोहली ( भारत) - २५४* धावा, ३३६ चेंडू, ३३ चौकार व २ षटकार वि. दक्षिण आफ्रिका, पुणेकेन विलियम्सन ( न्यूझीलंड) - २५१ धावा, ४१२ चेंडू, ३४ चौकार व २ षटकार वि. वेस्ट इंडिज, हॅमिल्टनदिमुथ करुणारत्ने ( श्रीलंका) - २४४ धावा, ४३७ चेंडू, २६ चौकार वि. बांगलादेश, पल्लेकेले
सर्वोत्तम वैयक्तिक गोलंदाजी (Best bowling figures in an innings) लसिथ इम्बुलडेनिया ( श्रीलंका) - ७-१३७ वि. इंग्लंडआर अश्विन ( भारत) - ७-१४५ वि. दक्षिण आफ्रिकाजसप्रीत बुमराह ( भारत) - ६-२७ वि. वेस्ट इंडिजस्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड ) - ६-३१ वि. वेस्ट इंडिजअक्षर पटेल ( भारत) - ६ -३८ वि. इंग्लंड
सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी ( Best bowling figures in a match) अक्षर पटेल ( भारत) - ११-७० वि. इंग्लंडकायले जेमिन्सन ( न्यूझीलंड) - ११-११७ वि. पाकिस्तानप्रविण जयविक्रमान ( श्रीलंका) - ११ -१७८ वि. बांगालदेशस्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड) - १०-६७ वि. वेस्ट इंडिजहसन अली ( पाकिस्तान) - १०-११४ वि. दक्षिण आफ्रिका