Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, पावसानं लावली वाट; राखीव दिवसापर्यंत चालणार सामना

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा अडीच तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 7:25 PM

Open in App
ठळक मुद्देसुरुवातीला लंच टाईमपर्यंत खेळ थांबवण्यात आला होता, परंतु तोपर्यंत पावसानं बरेच नुकसान केले होते.

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा अडीच तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला. पाऊस थांबला असला तरी मैदानावर पाणी असल्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. बीसीसीआयनं ट्विटवरून ही माहिती दिली.  सुरुवातीला लंच टाईमपर्यंत खेळ थांबवण्यात आला होता, परंतु तोपर्यंत पावसानं बरेच नुकसान केले होते.  WTC फायनलचा राखीव दिवस कधी वापरला जाईल?, आयसीसीचा नियम काय सांगतो ?आयसीसीनं WTC Final साठी 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. जर कसोटी सामन्यातील वाया गेलेला वेळ पाच दिवसांच्या खेळात भरून न निघाल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल. वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी पुढील दिवशी सामना 30 मिनिटे आधी सुरू केला जाईल किंवा दिवसअखेर 30 मिनिटांचा अधिक खेळ होईल. पण, आता या कसोटीचा पहिलाच दिवस पावसामुळे वाया गेल्यानं राखीव दिवसाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यातही निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

 भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी  IND vs NZ World Test Championship

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग IND vs NZ World Test Championship,  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड