WTC Final 2021 IND vs NZ : किवींना बसले धक्के, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलची फ्लाईंग कॅच, Video 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : एक तासाच्या खेळानंतर टीम इंडियाला अखेर पाचव्या दिवसाचे पहिले यश मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 05:54 PM2021-06-22T17:54:28+5:302021-06-22T17:58:10+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : What a flying catch by Shubman Gill, M Shami strikes, gets Ross Taylor, Video | WTC Final 2021 IND vs NZ : किवींना बसले धक्के, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलची फ्लाईंग कॅच, Video 

WTC Final 2021 IND vs NZ : किवींना बसले धक्के, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलची फ्लाईंग कॅच, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : एक तासाच्या खेळानंतर टीम इंडियाला अखेर पाचव्या दिवसाचे पहिले यश मिळाले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. त्यात केन विलियम्सन व रॉस टेलर ही जोडी बचावात्मक खेळ करून भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहत होती. पण, पाचव्या दिवशी मोहम्मद शमीनं किवींना धक्का दिला. त्यानं रॉस टेलरला ( ११) बाद केले. कव्हरवर उभ्या असलेल्या शुबमन गिलनं हवेत झेपावत झेल टिपला अन् टेलरला माघारी जाण्यास भाग पाडले.

रॉस टेलरनं जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंक्तित पटकावले स्थान

पाहा व्हडीओ...
 


WTC  फायनलचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही पावसानं अडथळा आणला. आजच्या पावच्या दिवसाचा खेळही पावसामुळे उशीरानं सुरू झाला. तिसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर गुंडाळला. कायले जेमिन्सननं पाच विकेट्स घेतल्या.  त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी किवी सलामीवीरांना माघारी पाठवले.  केन व टेलर यांनी ८८ चेंडूंत १६ धावांची भागीदारी केली. पण, शमीनं ही जोडी तोडली. त्यानंतर आलेल्या हेन्री निकोल्सला ( ७) इशांत शर्मानं रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. शमीे पुढच्या षटकात किवींना आणखी एक धक्का दिला अन् बीजे वॉटलिंगचा त्रिफळा उडवला. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today

जसप्रीत बुमराहनं केली एक चूक; पहिलं षटक टाकताच ड्रेसिंग रूमच्या दिशेनं पळत सुटला

रॉस टेलरचा विक्रम
या सामन्यात रॉस टेलरनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून असा विक्रम सर्वात प्रथम सचिन तेंडुलकरनं केला होता अन् न्यूझीलंडकडून हा भारी पराक्रम आज टेलरनं करून दाखवला. टेलरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावा पूर्ण केल्या आणि न्यूझीलंडकडून हा मैलाचा दगड सर करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.  रॉस टेलरनं १०७ कसोटींत ७५०६* धावा केल्या आहेत. २३३ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ८५८१ धावा, तर १०२ ट्वेंटी-२०त १९०९ धावा आहेत.
 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : What a flying catch by Shubman Gill, M Shami strikes, gets Ross Taylor, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.