World Test Championship (WTC) final India vs New Zealand : एक तासाच्या खेळानंतर टीम इंडियाला अखेर पाचव्या दिवसाचे पहिले यश मिळाले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. त्यात केन विलियम्सन व रॉस टेलर ही जोडी बचावात्मक खेळ करून भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहत होती. पण, पाचव्या दिवशी मोहम्मद शमीनं किवींना धक्का दिला. त्यानं रॉस टेलरला ( ११) बाद केले. कव्हरवर उभ्या असलेल्या शुबमन गिलनं हवेत झेपावत झेल टिपला अन् टेलरला माघारी जाण्यास भाग पाडले.
रॉस टेलरनं जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंक्तित पटकावले स्थान
पाहा व्हडीओ...
जसप्रीत बुमराहनं केली एक चूक; पहिलं षटक टाकताच ड्रेसिंग रूमच्या दिशेनं पळत सुटला
रॉस टेलरचा विक्रमया सामन्यात रॉस टेलरनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून असा विक्रम सर्वात प्रथम सचिन तेंडुलकरनं केला होता अन् न्यूझीलंडकडून हा भारी पराक्रम आज टेलरनं करून दाखवला. टेलरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावा पूर्ण केल्या आणि न्यूझीलंडकडून हा मैलाचा दगड सर करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. रॉस टेलरनं १०७ कसोटींत ७५०६* धावा केल्या आहेत. २३३ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ८५८१ धावा, तर १०२ ट्वेंटी-२०त १९०९ धावा आहेत.