World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे. भारतानं विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना किवींचे दोन्ही सलामीवीर ४४ धावांवर माघारी परतले. पण, केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं किवींचा डाव सावरला आहे, अशात भारताची चिंता वाढवणारं प्रसंग घडला. रिषभ पंत यानं प्रकृती बिघडल्यामुळे ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धाव घेतली आणि त्याच्या जागी वृद्धीमान सहा किपिंगला आला आहे. ( Wriddhiman Saha is keeping for India as Rishabh Pant is unwell.)
टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. आर अश्विननं सारा गेम पलटवला. त्यानं दोन्ही सलामीवीरांना ४४ धावांवर माघारी पाठवले. कर्णधार केन विलियम्सनलाही त्यानं पायचीत पकडले होते, परंतु DRSनंतर केन नाबाद असल्याचा निर्णय देण्यात आला. विराटच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ७१ विकेट्सचा विक्रम आर अश्विननं पटकावला. त्यानं पॅट कमिन्सचा ७० विकेट्सचा विक्रम मोडला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड ( ६९), टीम साऊदी ( ५६) आणि नॅथन लियॉन ( ५६) यांचा क्रमांक येतो. किवींनी २९ षटकांत २ बाद ७७ धावा केल्या आहेत.Ind vs NZ Test Final, WTC final 2021