World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने दोन दिवस वर्चस्व गाजवल्याचे पाहायला मिळत आहे. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं २ बाद १०१ धावा केल्या आहेत आणि चौथ्या दिवशी ११६ धावांची पिछाडी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे रद्द करावे लागले. त्यामुळे एकही चेंडू न खेळवात लंच घ्यावा लागला. साऊदॅम्प्टन येथे आता पावसानं विश्रांती घेतली असली तरी मैदान सुकवण्याचे काम जोरात सुरू आहे. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
सौदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींवरही भारी पडतेय भारतीय क्रिकेटपटू, १३ वर्षांची असताना सोडलं होतं घर!
दरम्यान, विराट कोहली जर्सीवरील बीसीसीआयच्या लोगोला किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कोहली फॅन्सकडे पाहून बीसीसीआयच्या लोगोला किस करून गोड हास्य देताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांची महागडी घरं; सचिन, विराट नव्हे तर 'हा' खेळाडू राहतो १०० कोटींच्या बंगल्यात!
पाहा व्हिडीओ...
तिसऱ्या दिवशी 3 बाद 146 धावांवरून सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी 217 धावांवर गुंडाळला. त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. र अश्विननं भारताला पहिली विकेट मिळवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 25 वेळा पहिली विकेट घेण्याच्या अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी अश्विननं बरोबरी केली. इशांत शर्मानं किवीला दुसरा झटका दिला. खेळपट्टीवर सेट झालेल्या कॉनवेला त्यानं बाद केलं, मोहम्मद शमीनं सुरेख झेल टिपला. कॉनवेनं 153 चेंडूंत 6 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर असताना अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. किवींच्या 2 बाद 101 धावा झाल्या असून ते 116 धावांनी पिछाडीवर आहेत. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today
Web Title: WTC final 2021 : Rain washes out first session of Day 4, Virat Kohli kisses and shows off BCCI logo to the fans, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.