WTC Final 2021 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. सराव सामन्यात रिषभ पंत, रोहित शर्मा, शुबमन गिल, लोकेश राहुल यांनी दमदार फटकेबाजी केली, तर इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांनी विकेट्स घेतल्या. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे स्टेडियमच्या बालकनीतून खेळाडूंना मार्गदर्शन करत होते. पण, भारतीय खेळाडूंसोबत टीम इंडियाचे कोच Winston लाही प्रशिक्षण देताना दिसले आणि त्याचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
डब्ल्यूटीसी फायनल ड्रॉ झाल्यास भारत-न्यूझीलंड संयुक्त विजेते भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना ड्रॉ झाला किंवा ‘टाय’ झाला तर विजेता कोण असेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात डोकावत होता. सामना ड्रॉ झाला किंवा ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने म्हटले आहे. १८ ते २२ जूनदरम्यान साऊथम्प्टन येथे हा सामना होईल. २३ जून हा राखीव दिवस असेल. हे दोन्ही निर्णय जून २०१८ ला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याआधीच घेण्यात आले होते, असेही आयसीसीने म्हटले आहे.
विजेत्या संघाला मिळणार 1.6 मिलियन डॉलर तर उपविजेत्याला...जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची समान विभागणी केली जाईल.
पाहा व्हिडीओ..
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव; लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला
न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग