भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंग्लंडमध्ये कसोटीचा विश्वचषक अंतिम सामना रंगला आहे. आज या सामन्याचा पाचवा दिवस आहे. आज ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी आणि भारताला सामना ड्रॉ करण्यासाठी झुंजावे लागणार आहे. भारतीय संघाने चौथ्या दिवसअखेर ३ बाद १६४ धावा केल्या आहेत. भारताला जर विजय मिळवायचा असेल तर ९७ षटकांत २८० धावा हव्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७ विकेट हवे असणार आहेत. परंतू, ऑस्ट्रेलिया विराट आणि अजिंक्य रहाणेला घेऊन चिंतेत आहे.
सामन्याचा आतापर्यंतचा खेळ पाहिल्यास ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. खेळपट्टी चेंडू कधी खाली, कधी उसळी घेत असल्याने भारतीय फलंदाजांना जास्त सावध फलंदाजी करावी लागणार आहे. कालच्या उत्तरार्धातील खेळता विराट कोहली आणि अजिंक्यने चांगले पाय रोवले होते. यामुळे ऑस्ट्रेलियाला तीन विकेटवरच समाधान मानावे लागले आहे.
पहिल्या डावात अजिंक्यने एकट्याने किल्ला लढविला होता. आज विराट आणि अजिंक्य या दोघांना किमान दुपारपर्यंत किल्ला लढवावा लागणार आहे. विराटने वेगाने धावा केल्या आहेत, यामुळे जर जिंकायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत विराटची विकेट घ्यावी लागणार आहे. पहिल्या डावात विराट स्वस्तात बाद झाला होता. परंतू, कालची त्याची बॅटिंग पाहता आज त्याने तोच आवेश कायम ठेवला तर भारताला २८० धावा देखील चेस करता येणार आहेत.
विराट कोहली सात चौकारांच्या मदतीने ४४ धावांवर खेळत आहे. तर रहाणे 20 धावांवर खेळत आहे. एका बाजुने रहाणेने आपले पाय भक्कम रोवले आहेत. दुसऱ्या बाजुने विराटला रनमशीन सुरु ठेवावी लागणार आहे, तरच ऑस्ट्रेलियावर दबाव वाढेल व भारतावरील कमी होणार आहे. विराटने आजही तुफान बॅटिंग केली तर या चिंतेने ऑस्ट्रेलियन संघाला ग्रासलेले आहे.
काय असणार कांगारुंची रणनिती
रहाणेने पहिल्या डावात ८९ धावांची दमदार खेळी करत भारतीय संघाला लवकर ऑलआऊट होण्यापासून वाचवले. अशा स्थितीत पाचव्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलिया प्रथम या दोन फलंदाजांना बाद करण्याकडे लक्ष देईल. सोबतच रन्सही कमी देण्याचा प्रयत्न करेल. कोहली आणि रहाणेने जर भक्कम पाय रोवले तर हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना दूर नेण्याची ताकद ठेवतात. संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजविल्यावर असे होणे ऑस्ट्रेलियाना नको असेल.
Web Title: WTC Final 2023 IND vs AUS: Australian players may not have slept through the night! have to wicket Virat kohli, Ajinkya rahane, otherwise...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.