ओव्हल : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिले दोन दिवस भारतासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरूवात केली. ट्रॅव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी पहिल्या डावात ४६९ पर्यंत मजल मारली. तर भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात केवळ २९६ धावा करता आल्या.
वादग्रस्त निर्णयाने गिल बाद
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात देखील शानदार खेळी केली. कांगारूच्या संघाने दुसऱ्या डावात ८ बाद २७० धावा करून डाव घोषित केला. त्यामुळे भारतीय संघाला 'अजिंक्य' लढतीत विजय मिळवण्यासाठी विजयासाठी १३७ षटकांत ४४४ धावांची गरज आहे. विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांना शानदार सुरूवात केली. पण स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीवर शुबमन गिल बाद झाला अन् भारताला पहिला झटका बसला. खरं तर हा वादग्रस्त निर्णय राहिला कारण भारतीय कर्णधार रोहित शर्मासह माजी खेळाडू हरभजन सिंगने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. थर्ड अम्पायरने निर्णय देताच रोहितचा चेहरा सर्वकाही सांगत होता. सेशन संपल्यानंतर हरभजन सिंगने प्रेझेंटेशनदरम्यान, अम्पायरच्या निर्णयावरून टीका केली. चेंडू जमिनीला स्पर्श करत असताना देखील गिलला बाद दिले असल्याचे भज्जीने म्हटले. दरम्यान, ७.१ षटकांत भारताने १ गडी गमावून ४१ धावा केल्या.
ओव्हलवर 'चीटर चीटर'च्या घोषणा
रोहित शर्मा संतापला
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्यासाठी रोहितसेनेसमोर डोंगराएवढे आव्हान आहे.
Web Title: WTC Final 2023 IND vs AUS cameron green caught Shubman Gill off Scott Boland but captain Rohit Sharma and former player Harbhajan Singh expressed displeasure over the controversial decision
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.