WTC Final 2023: लंडनच्या ओव्हल मैदानावर उद्या(7 जून)पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या चुरशीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची रणनीती काय असेल, यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. रोहितने दोन फिरकीपटूंना मैदानात उतरवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, दोन फिरकीपटूंना टीममध्ये घेण्याचा निर्णय आम्ही उद्या ठरवू. इथली खेळपट्टी रोज बदलतेय, हे पाहावं लागेल. आम्ही सर्व 15 खेळाडूंना तयार राहण्यास सांगितले आहे. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याचे आणि जास्तीत जास्त सामने आणि ही चॅम्पियनशिप जिंकण्याचे काम मला मिळाले आहे, ते काम प्रामाणिकपणे करू.
शुभमनला सल्ल्याची गरज नाही : रोहित
पत्रकार परिषदेत रोहितला शुबमन गिलबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, त्याला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. त्याने आयपीएलमध्ये मोठी कामगिरी केली आहे. शुभमन हा अत्यंत आत्मविश्वासी खेळाडू आहे. तो खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवेल अशी आशा संघाला आहे.
क्रिकेट तज्ज्ञांवर भाष्य...
रोहित पुढे म्हणाला, क्रिकेट तज्ज्ञ अनेक गोष्टींबद्दल बोलतात, पण कोणत्या संघाने उत्तम कामगिरी केली, हे पाच दिवसांनंतरच कळेल. प्रथमच आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या रोहितने स्पष्टपणे सांगितले की, मी या सामन्याबाबत जास्त विचार करत नाहीय. खूप विचार करून स्वत:वर जास्त दडपण घ्यायचे नाही.
WTC फायनलसाठी भारतीय टीम:रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनादकट, उमेश यादव, इशान किशन (विकेटकीपर).
स्टँडबाय खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सुर्यकुमार यादव.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ: पॅट कमिंस (कर्णधार), स्कॉट बोलैंड, एलेक्स केरी (विकेटकीपर), कैमरन ग्रीन, मार्कस हैरिस, ट्रैविस हेड, जोश इंगलिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, टॉड मर्फी, माइकल नेसर, स्टीव स्मिथ (उप-कर्णधार), मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर
स्टँडबाय खेळाडू: मिचेल मार्श, मैथ्यू रेनशॉ.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड (ओव्हलमध्ये)
• भारत- 14 टेस्ट, 2 विजयी, 5 पराभूत, 7 ड्रॉ
• ऑस्ट्रेलिया- 38 टेस्ट, 7 विजयी, 17 पराभूत, 14 ड्रॉ
भारत vs ऑस्ट्रेलिया टेस्ट रेकॉर्ड
एकूण 106 मॅच- भारत 32 विजयी, ऑस्ट्रेलिया 44 विजयी, 29 ड्रॉ, 1 टाय.
Web Title: WTC Final 2023 Ind vs Aus: How many spinners will field against Australia? Rohit Sharma told the strategy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.