Join us  

WTC Final: मैदानात पाऊल ठेवताच कॅप्टन रोहित शर्माच्या नावावर झाला मोठा पराक्रम!

अजब गोष्ट म्हणजे, तीच कामगिरी ऑस्ट्रेलियन कॅप्टन कमिन्सही आजच केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 3:42 PM

Open in App

Rohit Sharma Pat Cummins, WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंग्लंडच्या ओव्हल मैदानात सुरू असलेल्या कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने चार वेगवान गोलंदाजांसह केवळ एक स्पिनर म्हणजेच रविंद्र जाडेजाला संघात घेतले. रविचंद्रन अश्विन आणि इशान किशन यांना संधी मिळाली नाही. यात महत्त्वाची बाब म्हणजे, रोहित शर्माने मैदानात पाऊल ठेवताच एक मोठा पराक्रम केला. विशेष म्हणजे तोच पराक्रम ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने देखील केला.

दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकाच सामन्यात आपल्या नावावर एकच कामगिरी केल्याचे क्वचितच घडते. असेच काहीसे आजच्या सामन्यात घडले. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स मैदानात उतरताच त्यांच्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली गेली. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांशी संबंधित हा विक्रम त्यांच्या कसोटी सामन्याशी संबंधित ठरला. WTC अंतिम सामना रोहित आणि कमिन्स या दोघांच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधारांचा एकाच सामन्यात अर्धशतकी सामना असण्याचा योगायोग घडण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असेल.

रोहित शर्मा vs पॅट कमिन्स

आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 49 कसोटींमध्ये पॅट कमिन्सने 217 विकेट घेण्याव्यतिरिक्त 924 धावा केल्या आहेत. तर, रोहित शर्माने तितक्याच कसोटी सामन्यांमध्ये 3379 धावा केल्या आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत. रोहितच्या नावावर फलंदाजीत 1 द्विशतक, 9 शतके आणि 14 अर्धशतके आहेत. कमिन्सला रोहितपेक्षा कर्णधारपदाचा दुप्पट अनुभव आहे. रोहितने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यात त्याने 4 जिंकले आहेत, 1 गमावला आहे आणि 1 अनिर्णित खेळला आहे. दुसरीकडे, पॅट कमिन्सने आत्तापर्यंत 15 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे, ज्यात त्याने 8 जिंकले आहेत, 3 गमावले आहेत आणि 4 अनिर्णित खेळले आहेत.

भारतीय संघ- शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलियन संघ- डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रे़व्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, स्कॉट बोलंड

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App