WTC 2023 Final, Rain Effect: भारतीय क्रिकेट संघ ७ जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC WTC Final 2023) सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC फायनल) सामना इंग्लंडमधील लंडन शहरातील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या दिवसात इंग्लंडमध्ये सहसा पाऊस आणि थंडी असते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC फायनल) सामन्यावरही पावसाचे सावट आहे. अशा परिस्थितीत जर पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर कोणता संघ चॅम्पियन बनेल? जाणून घेऊया नियम...
सामन्यासाठी ठेवला राखीव दिवस, पण त्यातही 'ट्विस्ट'
केनिंग्टन ओव्हल येथील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (डब्ल्यूटीसी फायनल) सामना पावसामुळे वाहून गेला किंवा सामन्याचा निकाल लागला नाही, तर अशा परिस्थितीत कोणता संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकेल, याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. 7 जून ते 11 जून या कोणत्याही दिवशी, पावसामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात व्यत्यय आला तर, 12 जून या दिवशी हा सामना पुढे खेळला जाईल. 12 जून रोजी सामन्याचा निकाल लागण्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. त्यातही निर्णय न झाल्यास, पुढे काय... समजून घ्या
१२ जूनला देखील सामना न झाल्यास...?
पावसामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा निकाल राखीव दिवशी म्हणजे १२ जूनला देखील आला नाही, तर ICC भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करेल. ICC ने आधीच १२ जून रोजी राखीव दिवस ठेवला आहे, जेणेकरून पावसामुळे काही व्यत्यय आल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा निकाल लावता येईल. पावसामुळे १२ जूनलाही निकाल लागला नाही, तर भारत आणि ऑस्ट्रेलियाला संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
WTC अंतिम 2023 साठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क.