WTC Final 2023 : चेन्नई सुपर किंग्स, खरं म्हटलं तर महेंद्रसिंग धोनीला खेळाडूंना नवा जन्म देण्याची सवयच आहे. तो खेळाडू कितीही खराब कामगिरीतून जात असला तरी जेव्हा तो MS Dhoniच्या मार्गदर्शनाखाली येतो तेव्हा त्या खेळाडूचा आत्मविश्वास उंचावतो आणि त्याच्या कामगिरीत सुधारणा होते. भारताच्या कसोटी संघातून डच्चू मिळालेल्या अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) बाबतित असंच घडलेलं पाहायला मिळालं. अजिंक्यने रिस्टार्टचं बटन दाबलं आणि रणजी करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्यानंतर आयपीएल २०२३ मध्ये CSK ने दिलेल्या संधीचं सोनं त्यानं केलं आणि त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघात पुन्हा निवडले गेले.
WTC Finalसाठी टीम इंडिया जाहीर झाली, पण एक चूक केली! हर्षा भोगले यांनी ती पकडली अन् दिला सल्ला
पण, हे सर्व शक्य झालं नसतं, जर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी धोनीला कॉल केला नसता... भारताच्या कसोटी संघात अजिंक्य रहाणेच्या पुनरागमनामागे MS Dhoniचा हात आहे. ''श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणे हा आमच्या प्लानमध्ये होताच... त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याने तेथे यशही मिळवून दाखवलेय, परंतु मागील वर्षभरापासून तो कसोटी संघाच्या सेटअपमध्ये नव्हता. त्याने रणजी करंडक स्पर्धेत कशी कामगिरी केली, हे आम्ही पाहिले. त्यामुळेच राहुलने इनपूट घेण्यासाठी महेंद्रसिंग धोनीला कॉल केला,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्य़ाने इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले.
श्रेयस अय्यर याने माघार घेतल्यानंतर अजिंक्यला एक संधी देण्यासाठी द्रविड व रोहित शर्मा हे दोघंही प्रयत्नशील होते. सर्फराज खान यानेही देशांतर्गत स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्याने त्याच्याबाबतची विचारणा सुरू होती. पण, आयपीएलमध्ये त्याची बॅट थंडावलेली दिसली आणि जलदगती गोलंदाजांसमोर तो धडपडताना दिसला. त्यामुळे अजिंक्यची निवड केली गेली. सूर्यकुमार यादव याचा पर्यायही समोर होता, परंतु त्याचाही फॉर्म सध्या चांगला नाही. ७ ते ११ जून या कालावधीत लंडन येथील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही फायनल होणार आहे.
इंग्लंडमध्ये अजिंक्यने १५ कसोटींत ४३.०३च्या सरासरीने ७२९ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व पाच अर्धशतकांचा समावेश आहे. ओव्हल मैदानावरील त्याची कामगिरी काही खास नाही. येथे २०१४ ते २०२१ या कालावधीत खेळलेल्या तीन कसोटींत त्याला केवळ ५५ धावा करता आलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेने १७ कसोटींत दोन शतकं व ५ अर्धशतकांसह १०९० धावा केल्या आहेत.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गि, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: WTC Final 2023: MS Dhoni's inputs were taken by the Indian team management and selection committee before recalling Ajinkya Rahane for the WTC Final.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.