Join us  

WTC Final 2023: कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी भारतासह ३ संघ शर्यतीत; जाणून घ्या पुढील समीकरण...

WTC Final 2023: भारतीय संघाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खूपच सोपा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 6:02 PM

Open in App

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ ते ११ जून २०२३ दरम्यान ओव्हल येथे खेळवला जाईल. यासाठी आयसीसीने एक दिवस राखीव देखील ठेवला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत अजूनही ३ संघ आहेत, ते म्हणजे ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंका. या तीन संघांपैकी कोणतेही दोन संघ ७ जून रोजी ओव्हल येथे अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियन संघाची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. विशेषत: भारतीय संघासाठी अंतिम फेरी गाठणे खूप सोपे आहे. जाणून घ्या काय आहे तिन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्याचे समीकरण. 

भारताचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग

भारतीय संघाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खूपच सोपा आहे. आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी २ कसोटी सामने खेळणार आहे. जर भारतीय संघाने दोन्ही कसोटी सामने जिंकले तर ते अंतिम फेरीत पोहोचतील. याशिवाय दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिल्यास देखील भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल, भारतीय संघासाठी एक विजय पुरेसा आहे. पॉइंट टेबलमध्ये सध्या भारताची विजयाची टक्केवारी ६४.०६ आहे. 

ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये कसा पोहोचेल?

ऑस्ट्रेलियन संघाला भारताविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत त्याची विजयाची टक्केवारी ६६.६७ इतकी आहे. दोन्ही कसोटी सामने गमावल्याने ऑस्ट्रेलियन संघाचे मोठे नुकसान झाले नसून श्रीलंकेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन कसोटी सामन्यांपैकी एक कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला तर तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. ऑस्ट्रेलियन संघाने दोन्ही कसोटी सामने गमावले तर कांगारू संघाला अंतिम फेरी गाठणे कठीण होऊ शकते. कारण श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकले तर श्रीलंकेचा संघ पात्र ठरेल. 

श्रीलंकेसाठी पुढील समीकरण...

श्रीलंकेला अंतिम फेरी गाठायची असेल तर न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील. दोन कसोटी सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक पराभूत झाल्यास याचा फायदा ऑस्ट्रेलिया संघाला होईल. श्रीलंकेला अंतिम फेरी गाठायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत दोन्ही कसोटी सामने जिंकावेच लागतील. पण असे होणे अवघड वाटते. न्यूझीलंड संघ बलाढ्य संघ असून दोन्ही कसोटीत त्यांना पराभूत करणे अशक्य आहे. सध्या गुणतालिकेत श्रीलंकेची विजयाची टक्केवारी ५३.३३ आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल अपेक्षित-

सध्याच्या समीकरणानुसार भारत आणि ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खूपच सोपा आहे. ऑस्ट्रेलियाला एक कसोटी सामना जिंकावा लागेल किंवा दोन्ही अनिर्णित ठेवावे लागतील. त्याचबरोबर श्रीलंकेला अंतिम फेरी गाठायची असेल तर त्यांना त्यांचे दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App