ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६९ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघानं दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद १५१ धावा केल्या. ट्रेव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं साडेचारशे पार मजल मारली. त्यानंतर भारतीय संघाचे रोहित, गिल, पुजारा, कोहली स्वस्तात बाद झाले. जाडेजाने झुंज दिली, पण त्याचे अर्धशतक हुकले. सामन्यात अपेक्षा असलेला विराटही स्वस्तात माघारी परतला. त्यानं पहिल्या डावात केवळ १४ धावा केल्या.
विराट बाद झाल्यानंतर संपूर्ण स्टेडिअममध्ये शांतता पसरली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी आलेली विराटची पत्नी अनुष्कादेखील त्याच्या विकेटनंतर निराश दिसली. विराट बाद झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलल्याचे दिसले.
यापूर्वी अनुष्का अनेकदा विराटला सपोर्ट करण्यासाठी स्टेडिअमवर आली आहे. अनेकदा ती त्याला चिअर करतानाही दिसली. परंतु आता त्याच्या बाद होण्यानंतर तिची जी रिअॅक्शन होती ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
फलंदाजांनी केलं निराशदुसऱ्या दिवसाच्या खेळात रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. दोघे स्वस्तात बाद झाले. कर्णधार रोहित हाफ पिच चेंडूवर २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल चेंडू सोडून देताना, स्विंगने त्याला वेडं बनवलं. स्कॉट बोलंडचा बाहेरचा चेंडू सोडताना चेंडू आत आला आणि त्याचा स्टंप उडवला. अगदी तसाच पुजारादेखील बाद झाला. पुजारा शांत व संयमीपणे खेळत होता. पण २५ चेंडूंवर १४ धावांवर खेळताना त्याने चेंडू सोडला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कच्या बाऊन्सर चेंडूवर विराट कोहली १४ धावांवर झेलबाद झाला. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर माघारी परतला. दिवस अखेर भारताला ५ बाद १५१ अशी मजल मारता आली.