- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
डब्ल्यूटीसी फायनलच्या आधी प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड जखमी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. अचूक टप्प्यावर वेगवान मारा करण्यात हेजलवूड तरबेज आहे. हेजलवूड खेळणार नसल्यामुळे त्याच्या जागी मायकेल नेसरचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. हेजलवूडच्या अनुपस्थितीमुळे दोन प्रमुख वेगवान गोलंदाजांमध्ये संयोजन राखण्यात ऑस्ट्रेलियाला अडचण येणार आहे.
मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि फिरकीपटू नॅथल लायन ही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची फळी आहे. फलंदाजी स्थिर आहे. मात्र, हेजलवूड नसल्यामुळे त्याच्या जागी नेसर किंवा स्काॅल बोलंड यांच्यापैकी एकाला खेळवावे लागेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजीतील संतुलन बिघडणार आहे. मात्र, भारतीय हे विजयासाठी भारतीय संघाला पुरेसे नाही. भारताला या लढतीत विजय मिळविणे आवश्यक आहे. डब्ल्यूटीसीची अंतिम लढत जिंकण्याची भारताला दुसरी संधी आहे. २०२०-२१मध्ये पहिल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघाची कामगिरी निराशा करणारी होती. भारताला आता दुसरी संधी मिळाली आहे. भारताचा संघ अव्वल क्रमांकाचा आहे.
मात्र, भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी तेवढी तगडी आहे का? की ते हा सामना जिंकू शकतील. निश्चितपणे भारतीय संघ जिंकू शकेल. अजिंक्य रहाणेलाही नक्कीच संघात संधी मिळायला हवी. कारण त्याच्यात क्षमता आहे. अनुभवी असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीशी जुळवू घेतो. विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या फाॅर्ममुळे वेंगसरकर खूश आहेत. मात्र, त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे सोपे असणार नाही, असा इशाराही ते देतात. त्यामुळे इंग्लंडमध्ये विजय मिळविण्यासाठी मेहनत घ्यावी लागले. यष्टीरक्षकाबाबत वेंगसरकर सांगतात की, संघ व्यवस्थापनाने के. एस. भरतवर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे इशानला प्रतीक्षा करावी लागेल. हार्दिक पांड्या संघात असता तर तो भारतासाठी फायद्याचा ठरला असता. हार्दिक सध्या जखमी आहे. मात्र, जर तो हा एक कसोटी सामना खेळला असता तर भारतीय संघ अधिक तगडा ठरला असता. बुधवारी सामना सुरू होईल. परिस्थिती वेगवान गोलंदाजांना पोषक असेल. दोन्ही संघांवर दबाव असेल. जो संघ परिस्थितीशी जुळवून घेईल तो वरचढ ठरले. त्यामुळेच दोन्ही संघांचा सराव सामना व्हायला हवा होता. मात्र, तरीही दोन्ही संघांना समान संधी असेल.
दिलीप वेंगसरकर सांगतात...
माझी नुकतीच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्याशी चर्चा झाली. इंग्लंडमध्ये ते खूप खेळले असून, भरपूर धावाही केल्या आहेत. ते सांगतात की, पाच गोलंदाजांना खेळवणे भारतासाठी चांगले ठरेल. त्यातील दोन फिरकीपटू असल्यास फायद्याचे ठरेल. अश्विन, जडेजामध्ये सामना फिरविण्याची ताकद आहे. रोहित शर्मा कर्णधार आणि सलामीवीर अशी दुहेरी भूमिका तो पार पाडतो. आयपीएलमध्ये त्याने धावा केल्या नाहीत म्हणून तो फाॅर्ममध्ये नाही असे म्हणता येणार नाही. रोहितचे फुटवर्क चांगले असून, फाॅर्मही चांगला होता. मात्र, धावा झाल्या नाहीत. रोहित मोठ्या स्पर्धेत खेळणारा खेळाडू आहे.