WTC Final IND vs AUS : अजिंक्य रहाणेही गेला! कोणालाच न जमलेला विक्रम नावावर नोंदवला, भारताच्या ६ विकेट्स

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील फायनलच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 04:34 PM2023-06-11T16:34:00+5:302023-06-11T16:35:30+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final IND vs AUS : Ajinkya Rahane dismissed for 46, Rahane has now faced 100+ balls in an innings thrice in WTC Finals. Nobody else has done it more than once, India 213/7 | WTC Final IND vs AUS : अजिंक्य रहाणेही गेला! कोणालाच न जमलेला विक्रम नावावर नोंदवला, भारताच्या ६ विकेट्स

WTC Final IND vs AUS : अजिंक्य रहाणेही गेला! कोणालाच न जमलेला विक्रम नावावर नोंदवला, भारताच्या ६ विकेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील फायनलच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. स्कॉट बोलंडच्या एका षटकाने संपूर्ण मॅच फिरली. सेट फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याचा अविश्वसनीय झेल स्टीव्ह स्मिथने टिपला अन् नंतर एका चेंडूच्या फरकाने बोलंडने अष्टपैलू रवींद्र जडेजाला ( ०) चालतं केलं. आता अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane) सर्व भीस्त होती, परंतु मिचेल स्टार्कने त्याची विकेट मिळवली.  पण, त्याने मोठा विक्रम करून दाखवला आहे. 

WTC Final IND vs AUS : W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल

४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि अजिंक्य यांनी संयमी खेळ केला.  भारताबाहेर कसोटीत २०८२* धावांची भागीदारीचा टप्पा  या दोघांनी ओलांडला.  राहुल द्रविड वि सचिन तेंडुलकर ( ३७२८), राहुल द्रविड व व्ही  व्ही एस लक्ष्मण ( २६८१) आणि तेंडुलकर व सौरव गांगुली ( २४०२)  यांनी असा पराक्रम केला आहे. स्कॉट बॉलंडने टाकलेल्या ४७व्या षटकात विराटला बाद करण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्सने DRS घेतला, पंरतु चेंडू व बॅट यांच्यात संपर्कच झाला नव्हता. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात होते, पण, तिसऱ्या चेंडूवर घात घाला. 


बॉलंडने टाकलेला चेंडू बाहेर जात होता अन् विराट त्यावर ड्राईव्ह मारायला गेला. चेंडूने विराटच्या बॅटची किनार घेतली अन् स्टीव्हन स्मिथने स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला. विराट ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर बाद झाला अन् अजिंक्यसह त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रवींद्र जडेजाही ( ०) भोपळ्यावर बाद झाला. WTC Finals मध्ये तीन वेळा १०० + चेंडूंचा सामना करणारा तो पहिला फलंदाज ठरला. आहे. त्याने २०२१मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात ११७ चेंडूंचा साना केला होता. २०२३च्या फायलनमध्ये पहिल्या डावात १२९ आणि दुसऱ्या डावात १०८ चेंडूंचा सामना केला.

अजिंक्य ७ चौकारांच्या मदतीने ४६ धावांवर झेलबाद झाला. भारताला २१२ धावांवर सहावा धक्का बसला. नॅथन लाएनने शार्दूल ठाकूरला पायचीत केले अन् भारताचा सातवा फलंदाज २१३ धावांवर माघारी परतला. 

Web Title: WTC Final IND vs AUS : Ajinkya Rahane dismissed for 46, Rahane has now faced 100+ balls in an innings thrice in WTC Finals. Nobody else has done it more than once, India 213/7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.