Join us  

ICC च्या २१ ट्रॉफी! ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, WTC Final जिंकून ठरला जगातील एकमेव संघ

WTC Final India vs Australia : ऑस्ट्रेलियाने उत्तम सांघिक कामगिरी करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 5:23 PM

Open in App

WTC Final India vs Australia : ऑस्ट्रेलियाने उत्तम सांघिक कामगिरी करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकली. भारतीय संघावर त्यांनी २०९ धावांनी दणदणीत विजय मिळवला अन् इतिहास घडविला. 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभा केला अन् भारताचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात काही खास झाली नाही, परंतु त्यांनी ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि अजिंक्य यांनी संयमी खेळ केला. बोलंडने टाकलेल्या ४७व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घात झाला. विराट ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर बाद झाला अन् अजिंक्यसह त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. 

रवींद्र जडेजाही ( ०) भोपळ्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर अजिंक्य ७ चौकारांच्या मदतीने ४६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर नॅथन लिएनने फास आवळला. श्रीकर भरत २३ धावांवर बाद झाला. भारताचा संपूर्ण संघ २३४ धावांत माघारी परतला अन् ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी विजय मिळवताना WTC Final जिंकली. नॅथनने ४, बोलंडने तीन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली अन् एका वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली.

आयसीसीच्या सर्व सहा स्पर्धा जिंकणारा तो पहिला संघ ठरला. शिवाय आयसीसीच्या सर्व सिनियर स्थराच्या स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे. 

पुरूष वन डे वर्ल्ड कप - ५पुरूष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - १पुरूष चॅम्पियन्स ट्रॉफी - २ महिला वन डे वर्ल्ड कप - ६महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - ६पुरूष  जागतिक कसोटी अजिंक्यपद - १  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया
Open in App