WTC Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! भारताचा ICC ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ कायम, कांगारूंसमोर लोटांगण

WTC Final India vs Australia : २०२१ मध्ये न्यूझीलंडकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा बाजी मारू असे वाटले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 05:06 PM2023-06-11T17:06:46+5:302023-06-11T17:08:21+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final IND vs AUS : The wait continues for team India, 10 years since the last ICC Trophy; Australia wins their maiden ICC World Test Championship title | WTC Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! भारताचा ICC ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ कायम, कांगारूंसमोर लोटांगण

WTC Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! भारताचा ICC ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ कायम, कांगारूंसमोर लोटांगण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WTC Final India vs Australia : सलामीवीर रोहित शर्मा व शुबमन गिल यांचे अपयश, कौंटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा चोपणाऱ्या चेतेश्वर पुजाराने घातलेले शेपूट यामुळे भारताच्या अन्य फलंदाजांवर दडपण वाढले. विराट कोहलीने दुसऱ्या डावात चांगला खेळ केला, परंतु तोपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या हातात सामना गेला होता. पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) दोन्ही डावांत चांगली फलंदाजी केली, परंतु त्याला साथ नाही मिळाली. केएस भरतने आणखी एक संधी गमावली. पण, या सर्व चुकांमुळे भारताला १० वर्षांनंतर पुन्हा एकदा ICC स्पर्धा जिंकण्याची संधी गमवावी लागली. २०२१ मध्ये न्यूझीलंडकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा बाजी मारू असे वाटले होते. पण, ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खात्यात आणखी एक ICC ट्रॉफी जमा केली. 

  • २०१३ नंतर भारताची ICC स्पर्धेमधील कामगिरी
  • २०१४ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल
  • २०१५ वर्ल्ड कप उपांत्य फेरी
  • २०१६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरी
  • २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल
  • २०१९ वर्ल्ड कप उपांत्य फेरी
  • २०२१ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा फायनल 
  • २०२२ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरी
  • २०२३  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा फायनल 

 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभा केला अन् भारताचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात काही खास झाली नाही, परंतु त्यांनी ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि अजिंक्य यांनी संयमी खेळ केला. बोलंडने टाकलेल्या ४७व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घात झाला. बोलंडने टाकलेला चेंडू बाहेर जात होता अन् विराट त्यावर ड्राईव्ह मारायला गेला. चेंडूने विराटच्या बॅटची किनार घेतली अन् स्टीव्हन स्मिथने स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला. विराट ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर बाद झाला अन् अजिंक्यसह त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रवींद्र जडेजाही ( ०) भोपळ्यावर बाद झाला.


मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर अजिंक्य ७ चौकारांच्या मदतीने ४६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर नॅथन लिएनने सातवा झटका देताना शार्दूल ठाकूरला पायचीत केले. मिचेल स्टार्कने आणखी एक धक्का देताना उमेश यादवला अप्रतिम बाऊन्सरवर झेलबाद केले. अॅलेक्स केरीने अफलातून झेल टिपला. नॅथनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रीकर भरत २३ धावांवर बाद झाला. भारताचा संपूर्ण संघ २३४ धावांत माघारी परतला अन् ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी विजय मिळवताना WTC Final जिंकली. 

Web Title: WTC Final IND vs AUS : The wait continues for team India, 10 years since the last ICC Trophy; Australia wins their maiden ICC World Test Championship title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.