Join us  

WTC Final IND vs AUS : W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल निर्णायक वळणावर आहे. भारतीय संघाला विजयासाठी २८० धावा आज करायच्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 3:39 PM

Open in App

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल निर्णायक वळणावर आहे. भारतीय संघाला विजयासाठी २८० धावा आज करायच्या होत्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला WTC ट्रॉफी उंचावण्यासाठी ९० षटकांत ७ विकेट्स काढायच्या होत्या. स्कॉट बोलंडच्या एका षटकाने सारे चित्र बदलले.. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभा केला अन् भारताचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात काही खास झाली नाही, परंतु त्यांनी ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. शुबमन गिलचा वादग्रस्त झेल, यामुळे कसोटीचा तिसरा दिवस चर्चेत राहिला. विराट व अजिंक्यने भारताचा डाव सावरून चौथ्या दिवसअखेर ३ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला आजच्या दिवसात विजयासाठी आणखी २८० धावा करायच्या आहेत.

शुबमन गिल अडचणीत? 'ते' ट्विट महागात पडणार; BCCI ने व्यक्त केली नाराजीस्कॉट बॉलंडच्या पहिल्याच षटकात अजिंक्यच्या प्रत्येक डिफेन्सवर भारतीय चाहते गोंगाट करताना दिसले. विराट आणि अजिंक्य यांनी भारताबाहेर कसोटीत २०८२* धावांची भागीदारीचा टप्पा ओलांडला.  राहुल द्रविड वि सचिन तेंडुलकर ( ३७२८), राहुल द्रविड व व्ही  व्ही एस लक्ष्मण ( २६८१) आणि तेंडुलकर व सौरव गांगुली ( २४०२)  यांनी असा पराक्रम केला आहे. स्कॉट बॉलंडने टाकलेल्या ४७व्या षटकात विराटला बाद करण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्सने DRS घेतला, पंरतु चेंडू व बॅट यांच्यात संपर्कच झाला नव्हता. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात होते, पण, तिसऱ्या चेंडूवर घात घाला. 

बॉलंडने टाकलेला चेंडू बाहेर जात होता अन् विराट त्यावर ड्राईव्ह मारायला गेला. चेंडूने विराटच्या बॅटची किनार घेतली अन् स्टीव्हन स्मिथने स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला. विराट ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर बाद झाला अन् अजिंक्यसह त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रवींद्र जडेजाही ( ०) भोपळ्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ५ बाद १७९ अशी झाली. 

  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहलीस्टीव्हन स्मिथरवींद्र जडेजाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App