WTC Final IND vs BAN, 1st Test : ट्वेंटी-२०मध्ये निराशा आता कसोटी वर्ल्ड कपमधून आशा! एक चूक अन् टीम इंडिया गमावेल ICC ट्रॉफी

WTC Final IND vs BAN, 1st Test : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 11:49 AM2022-12-13T11:49:46+5:302022-12-13T12:03:45+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final IND vs BAN, 1st Test : check what India needs to do to make it to ICC World Test Championship 2021-23 FINAL?, 1st Test start from tomorrow   | WTC Final IND vs BAN, 1st Test : ट्वेंटी-२०मध्ये निराशा आता कसोटी वर्ल्ड कपमधून आशा! एक चूक अन् टीम इंडिया गमावेल ICC ट्रॉफी

WTC Final IND vs BAN, 1st Test : ट्वेंटी-२०मध्ये निराशा आता कसोटी वर्ल्ड कपमधून आशा! एक चूक अन् टीम इंडिया गमावेल ICC ट्रॉफी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WTC Final IND vs BAN, 1st Test : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे. २०१३ नंतर भारताला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मागील १० वर्षांत दोन वेळा भारतीय संघाला ट्रॉफीच्या जवळ जाऊन अपयश आले होते. पण, आता १० वर्षांनी पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या अपयशामुळे ही संधी मिळाली आहे. पाकिस्तानला त्यांच्याच घरी इंग्लंडने सलग दोन कसोटी सामन्यांत पराभूत केले आणि पाकिस्तानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( ICC World Test Championship 2021-23 FINAL) फायनल खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.  पण, ही भारतासाठी मोठी संधी ठरली.

भारत-बांगलादेश ( India vs Bangladesh) यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरूवात होत आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या कसोटीत बांगलादेशचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. वन डे मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ कसोटीत चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी दावेदावी पक्की करण्यासाठी भारताला ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि एक चूक त्यांनाही कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीतून बाहेर करू शकते.

भारताला फायनलसाठी काय करावं लागेल?

  • WTC तालिकेत भारतीय संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे
  • भारताला WTC सर्कलमध्ये एकूण सहा ( २ वि. बांगलादेश आणि ४ वि. ऑस्ट्रेलिया) कसोटी सामने खेळायचे आहेत
  • सहा पैकी पाच कसोटी सामने जिंकून भारत WTC फायनलमध्ये स्थान पक्कं करू शकतो
  • भारताने सहापैकी सहा सामने जिंकले तर त्यांची विजयाची टक्केवारी ६८.०६ होईल आणि त्यांचे स्थान पक्कं होईल
  • सहापैकी ५-१ असा विजय मिळवला तर भारताची टक्केवारी ६२.५ इतकी होईल आणि दुसऱ्या स्थानासह ते फायनलला पोहोचतील. सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ बाहेर जाईल
  • पण, सहापैकी २ कसोटी गमावल्यास भारताचे कसोटी वर्ल्ड कप फायनलला जाणे अशक्य होऊन बसेल.
  • ऑस्ट्रेलिया ७५ टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( ६० टक्के), श्रीलंका ( ५३.३३ टक्के), भारत ( ५२.०८ टक्के) आणि इंग्लंड ( ४४.४४ टक्के) असा क्रम येतो. 

 

 

भारताचा कसोटी संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकत

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: WTC Final IND vs BAN, 1st Test : check what India needs to do to make it to ICC World Test Championship 2021-23 FINAL?, 1st Test start from tomorrow  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.