Join us  

कॅप्टन रोहित खेळणार 'स्मार्ट' चाल! 'या' मॅचविनरला Playing XI मध्ये मिळणार संधी?

WTC Final 2023 IND vs AUS: संघातील अनेक अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे जायबंदी आहेत. त्यामुळे रोहित अचानक एखादा आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकतो, अशी चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 11:42 AM

Open in App

Rohit Sharma Team India Playing XI, WTC Final 2023 IND vs AUS: टीम इंडियाला इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जून ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल)चा अंतिम सामना खेळायचा आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एक स्मार्ट चाल चालणार असल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अशा धडाकेबाज खेळाडूला संधी देईल, जो मधल्या फळीत फलंदाजी करून संघाला वेगळाच प्रभाव पाडू शकेल.

WTC फायनलमध्ये कर्णधार रोहित शर्माची धोकादायक चाल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये केएस भरत की इशान किशन, कोणाला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी द्यायची या संभ्रमात टीम इंडिया आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाला इशान किशनची गरज आहे. कारण केएस भरत एक यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आतापर्यंत फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्हीमध्ये अपयशी ठरला आहे. टीम इंडियाला एका स्फोटक फलंदाज असलेल्या यष्टिरक्षकाची गरज आहे, जो इंग्लंडमध्ये फलंदाजी करू शकेल.

रोहित देणार इशानला प्लेइंग 11 मध्ये एन्ट्री?

ऋषभ पंत अपघातामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून (WTC फायनल) बाहेर आहे. अशा परिस्थितीत ऋषभ पंतसारख्या स्फोटक यष्टीरक्षक फलंदाजाची भरपाई करण्यासाठी BCCI आणि रोहित शर्मा ईशान किशनला संधी देऊ शकते. ईशान किशनने 10 डिसेंबर 2022 रोजी चितगाव येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशविरुद्ध 131 चेंडूत 210 धावा केल्या होत्या. इशान किशनने द्विशतकी स्फोटक खेळीत 24 चौकार आणि 10 षटकार ठोकले होते.

ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढणार!

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे भारताला मधल्या फळीत एक्स-फॅक्टरची उणीव भासेल. मधल्या फळीत ऋषभ पंतच्या एक्स-फॅक्टरची कमतरता ईशान किशन भरून काढू शकतो. इशान किशनने निवडकर्त्यांना दाखवून दिले आहे की त्याच्यात मोठी खेळी खेळण्याची ताकद आहे. त्यामुळे त्याच्या संघातील समावेशाने ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढणार हे नक्की.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माइशान किशनरिषभ पंत
Open in App