‘नॉकआऊट’चे रडगाणे सुरूच... ज्याची भीती होती अखेर तेच झाले!

IPL स्पर्धा खेळल्यानंतर अचानक कसोटी क्रिकेटला भारतीय खेळाडू कसे आत्मसात करतील, याबाबत अनेकांच्या मनात शंका होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 06:33 AM2023-06-12T06:33:21+5:302023-06-12T06:34:00+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final: The 'knockout' cries continue... | ‘नॉकआऊट’चे रडगाणे सुरूच... ज्याची भीती होती अखेर तेच झाले!

‘नॉकआऊट’चे रडगाणे सुरूच... ज्याची भीती होती अखेर तेच झाले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड- सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

ज्याची भीती होती अखेर तेच झाले. दीर्घकाळ आयपीएलसारखी मर्यादित षटकांची स्पर्धां खेळल्यानंतर अचानक कसोटी क्रिकेटला भारतीय खेळाडू कसे आत्मसात करतील, याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. अपेक्षेनुरूप क्रिकेटच्या या दीर्घ प्रकारात भारतीय संघ संयम दाखवू शकला नाही आणि २०१४ नंतर सलग आठव्या वेळेला आयसीसीच्या नॉकआऊट सामन्यामध्ये पराभूत झाला. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांची बाद होण्याची पद्धत दीर्घकाळ फलंदाजी करण्याची मानसिकता नसल्याचे प्रमाण होते. रहाणे आणि शार्दूल जरुर लढले, मात्र भारताला अजिंक्य करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

चांगल्या सुरुवातीनंतरही कच खाल्ली

दुसऱ्या डावात रोहित, विराट आणि रहाणेने चांगली सुरुवात केली होती. मात्र, अर्धशतकानजीक पोहोचताच वाईट फटका मारून ते बाद झाले. संघाच्या हितापेक्षा वैयक्तिक विक्रमावरच त्यांचे जास्त लक्ष असल्याचे यावरून भासले. त्यांना बाद होताना बघणे क्लेशदायक होते. दुसरीकडे स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ॲलेक्स कॅरी आणि मार्नस लाबूशेन या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीचा वस्तुपाठच घालून दिला.

अश्विनला वगळणे मोठी चूक

डब्ल्यूटीसीच्या या हंगामात भारतासाठी सर्वाधिक ६१ बळी घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनला वगळणे ही रोहित आणि राहुल द्रविड यांची मोठी चूक ठरली. अश्विन मॅचविनर खेळाडू आहे. अंतिम सामन्यात कशी कामगिरी करायची असते, याची त्याला चांगली जाण आहे. त्यामुळेच तो अंतिम अकरामध्ये हवा होता. असो आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा अजून लांबणीवर पडलेली आहे. काही महिन्यांनंतर भारतात एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक खेळविला जाईल. तेव्हा हा दुष्काळ संपतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नॉकआऊटमधील भारताची कामगिरी

स्पर्धा    वर्ष    सामना    प्रतिस्पर्धी

  • टी-२० विश्वचषक     २०१४     अंतिम फेरी     श्रीलंका
  • वन-डे विश्वचषक     २०१५     उपांत्य फेरी     ऑस्ट्रेलिया
  • टी-२० विश्वचषक     २०१६     उपांत्य फेरी     वेस्ट इंडीज
  • चॅम्पियन्स ट्रॉफी     २०१७     अंतिम फेरी     पाकिस्तान
  • वनडे विश्वचषक     २०१९     उपांत्य फेरी     न्यूझीलंड
  • डब्लूटीसी     २०१९-२१     अंतिम फेरी     न्यूझीलंड
  • टी-२० विश्वचषक     २०२२     उपांत्य फेरी     इंग्लंड
  • डब्लूटीसी     २०२१-२३     अंतिम फेरी     ऑस्ट्रेलिया


मुन्नवर राना यांचा एक प्रसिद्ध 'शेर' आहे. त्यात थोडा बदल करुन म्हणावेसे वाटते की, 

उम्मीद भी किरदार पर पूरी नहीं उतरी
टीम रोहित की भी मयार पर खरी नहीं उतरी

 

 

Web Title: WTC Final: The 'knockout' cries continue...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.