WTC Points Table after Adelaide Test India slip to 3rd after pink ball loss : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पिंक बॉल टेस्टमधील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा रेकॉर्ड सुधारण्यात अपयश आले. अॅडिलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच कसोटी मालिका गमावली. दोन्ही डावात भारतीय आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या ढिसाळ कामगिरीमुळे टीम इंडियावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
टीम इंडियाची अव्वलस्थानावर तिसऱ्या क्रमांकावर झाली घसरण
या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थिती बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळताना पर्थ कसोटी जिंकत भारतीय संघ WTC गुणतालिकेत टॉपला पोहचला होता. पण आता या जागेवर पुन्हा ऑस्ट्रेलियानं कब्जा केले आहे. एवढेच नाही तर टीम इंडियाची थेट पहिल्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थिती बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळताना पर्थ कसोटी जिंकत भारतीय संघ WTC गुणतालिकेत टॉपला पोहचला होता. पण आता या जागेवर पुन्हा ऑस्ट्रेलियानं कब्जा केले आहे. एवढेच नाही तर टीम इंडियाची थेट पहिल्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
टीम इंडियापेक्षा दक्षिण आफ्रिकेचा संघ ठरला भारी
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया संघ आता टॉपला आहे. यंदाच्या तिसऱ्या हंगामात १४ सामन्यातील ९ विजय, ४ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात १०२ गुण जमा असून त्यांच्या विजयाची टक्केवारी ही ६०.७१ टक्के अशी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ९ सामन्यातील ५ विजय, ३ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह त्यांनी ६४ गुणांची कमाई केली असून या संघाच्या विजयाची टक्केवारी ही ५९.२६ टक्के एवढी आहे. भारतीय संघाने १६ सामन्यात ९ विजय, ६ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ११० गुण कमावले असून संघाची विजयाची टक्केवारी ही आता ५० टक्के इतकी आहे.