WTC Points Table Latest Update : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरुचं मैदान मारत न्यूझीलंड संघाने ३६ वर्षांनी भारतात कसोटी सामना जिंकला. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यातीत आघाडीवर असलेल्या टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे.
भारतीय संघ टॉपला, विजयाची टक्केवारी घसरली
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलच्या शर्यतीत ११ सामन्यातील ८ विजय, २ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ७४.२४ विनिंग पर्सेंटेजसह आघाडीवर होता. बंगळुरुच्या मैदानातील पराभवामुळे भारतीय संघाची विजयाची टक्केवारी घसरली आहे. हा आकडा आता ६८.०६ वर येऊन पोहचला आहे. गुणतालिकेत भारतीय संघ अद्याप अव्वलस्थानावर असला तरी या पराभवामुळे टीम इंडियाा फायनलचा मार्ग मुश्किल होऊ शकतो. .ज्याचा सर्वाधिक फायदा श्रीलंकेला झाला आहे.
ऑस्ट्रलिया पाठोपाठ श्रीलंकेचा लागतो नंबर
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानावर आहे. कांगारुच्या संघाच्या खात्यात १२ सामन्यातील ८ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ६२.५० विनिंग पर्सेंटेजसह ९० गुण जमा आहेत. या शर्यतीत श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत ९ कसोटी सामन्यातील ५ विजय आणि ४ विजयासह ५५.५६ विनिंग पर्सेंटेजसह ६० गुण कमावले आहेत. श्रीलंकेचा संघ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. जर त्यांनी इंग्लंड दौऱ्यावरील कामगिरीची पुनरावृत्ती केली तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.
न्यूझीलंडसह इंग्लंड टॉप ५ मध्ये
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामातील विजेता न्यूझीलंडच्या संगाने टीम इंडियाविरुद्धच्या विजयासह विनिंग पर्सेंटेजमध्ये सुधारणा केली आहे. ते आता ४४.४४ विजयी टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. पण टॉप २ मध्ये पोहचणे त्यांच्यासाठी खूपच अवघड आहे. त्यांच्या पाठोपाठ इंग्लंड ४३.०६ विनिंग पर्सेंटेजसह टॉप ५ मध्ये आहे. दक्षिण आफ्रिका (३८.८९ विजयी टक्केवारी ), बांगलादेश (३४.३८ -विजयी टक्केवारी ). पाकिस्तान (२५.९३-विजयी टक्केवारी ) आणि वेस्ट इंडिज (१८.५९ विजयी टक्केवारी ) हे संघ अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकार आहेत.