Join us  

Ranji Trophy : सूर्याचे शतक हुकले पण बाकीचे गडी पेटले! यशस्वी जैस्वालपाठोपाठ अजिंक्य रहाणेही वेगाने शतक ठोकले

Ranji Trophy 2022 : मुंबईच्या फलंदाजांनी रणजी करंडक स्पर्धेत घरचं मैदान गाजवले.. मुंबईच्या BKC मैदानावर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दमदार फलंदाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 3:45 PM

Open in App

Ranji Trophy 2022 : मुंबईच्या फलंदाजांनी रणजी करंडक स्पर्धेत घरचं मैदान गाजवले.. मुंबईच्या BKC मैदानावर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दमदार फलंदाजी केली. तीन वर्षांनंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फॉर्म कायम राखला, परंतु त्याचे शतक थोडक्यात हुकले. मात्र, यशस्वी जैस्वाल व कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दम दाखवताना वैयक्तिक शतकी खेळी केली. अजिंक्यने कमी चेंडूंत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३८वे शतक पूर्ण केले. 

सूर्यकुमार यादवची 'रणजी'मध्ये जोरदार फटकेबाजी; १६ चेंडूंत चोपल्या ६६ धावा, पण थोडक्यात हुकले शतक

पृथ्वी शॉ २१ चेंडूंत १९ धावांवर माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांनी  तुफान फटकेबाजी केली. सूर्याने खास वन डे स्टाईल फलंदाजी करताना यशस्वीसह १५३ धावांची भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर हैदराबादचा गोलंदाज शशांक एमला सूर्याची विकेट मिळवण्यात यश आले. सूर्या ८० चेंडूंत ९० धावा करून माघारी परतला. त्याच्या या खेळीत १५ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. यशस्वी १०९ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ६९ धावांवर खेळतोय.

त्यानंतर यशस्वी व अजिंक्य यांनी चांगली फटकेबाजी केली आणि तिसऱ्या विकेटसाठी २०६ धावा जोडल्या. यशस्वीने भारत अ संघाकडून खेळताना बांगलादेश दौऱ्यावर यजमानांच्या अ संघांची चांगलीच धुलाई केली होती. रणजी स्पर्धेतही त्याने फॉर्म कायम राखला. १९५ चेंडूंत २७ चौकार व १ षटकार खेचत त्याने १६२ धावांची मोठी खेळी केली. शशांक एम याने त्यालाही बाद केले. अजिंक्यने १२१ चेंडूंत  शतक पूर्ण करताना १४ चौकार व  २ षटकार खेचले. मुंबईने ७२ षटकांत ३ बाद ३८७ धावा केल्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :रणजी करंडकअजिंक्य रहाणेसूर्यकुमार अशोक यादवमुंबईहैदराबाद
Open in App