ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसह ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी इंग्लंड विरुद्ध रंगणाऱ्या वनडे मालिकेतून यशस्वी जैस्वालसह या दोघांना वनडे संघात पदार्पणाची संधी मिळू शकते. इथं एक नजर टाकुयात अशा ३ क्रिकेटर्संवर ज्यांना ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत रंगणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत मिळू शकते संधी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी जैस्वालसाठी इंग्लंड दौरा असेल खास
यशस्वी जैस्वाल याने अल्पावधित आपली छाप सोडलीआहे. २३ वर्षीय युवा सलामीवीराला इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत संधी मिळू शकते. जैस्वालनं टी-२० सह टेस्टमध्ये आपल्यातील क्लास दाखवून दिला आहे. आता वनडेत छाप सोडण्यासाठी तो उत्साहित असेल. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही तो टीम इंडियाचा भाग असेल, असे बोलले जाते. रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या बॅकअपच्या रुपात तो पहिली पसंती असेल.
नितीशकुमार रेड्डी
२१ वर्षीय क्रिकेटर नितीशकुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्यातील धमक दाखवून दिलीये. कसोटीत छाप सोडल्यानंतर आता हा क्रिकेटर वनडे संघात एन्ट्रीसाठी तयार आहे. बॉर्डर गावसकर स्पर्धेत एका बाजूला स्टार खेळाडू अपयशी ठरले तिथं या युवा खेळाडूनं मैदानात तग धरून सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संभाव्य संघात या अष्टपैलू खेळाडूचा समावेश असून इंग्लंड विरुद्ध घरच्या मैदानात तो पहिला वनडे सामना खेळताना दिसले तर नवल वाटणार नाही.
हर्षित राणाचंही वनडे पदार्पण निश्चित
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळणार नाही. या स्पर्धेआधी जसप्रीत बुमराहसह स्टार गोलंदाजांना विश्रांती मिळू शकते. या परिस्थितीत हर्षित राणासाठी वनडेत पदार्पणाची संधी निर्माण झाल्याचे पाहायला मिळेल. आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्यावर हर्षित राणाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली होती. कसोटीत ३ डावात ४ विकेट्स घेणारा हर्षित राणा इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाच्या गोलंदाजीतील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असेल, असा मोहाल निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.