Yashasvi Jaiswal, Team India Injury Updates, IND vs NZ 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना टीम इंडियासाठी आतापर्यंत फारसा खास राहिलेला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला होता, तर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावांत सर्वबाद झाला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला. संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. खेळाच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालदेखील दुखापतग्रस्त झाला होता, पण फलंदाजीला मात्र तो हजर झाला.
पंत नंतर यशस्वी जैस्वालही जखमी
भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली केली. सुरुवातीला न्यूझीलंडला मोठे धक्के देण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवले. दिवसाची पहिली विकेट मोहम्मद सिराजच्या नावावर होती. मोहम्मद सिराजने डॅरेल मिचेलला बाद केले. मिचेलला बाद करण्यात यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) महत्त्वाचे योगदान दिले. त्याने अप्रतिम झेल घेतला. अतिशय वेगवान फटका मारलेला असताना यशस्वीने झेल पकडला. यादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. दुखापतीमुळे त्याला मैदाना सोडावे लागले आणि यशस्वी जैस्वालच्या जागी अक्षर पटेलला मैदानात यावे लागले.
जैस्वालची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र जैस्वालची दुखापत हे टीम इंडियासाठी मोठे टेन्शन आहे. तो यावर्षी भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याची अलीकडची कामगिरीही चांगली झाली आहे. भारतीय डावाला दुसऱ्या डावात त्याची खूप गरज भासणार आहे. अशा वेळी जैस्वाल कधीपर्यंत तंदुरूस्त होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
ऋषभ पंत दुखापतग्रस्त
खेळाच्या दुसऱ्या दिवशी विकेटकीपिंग करताना पंतला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्या जागी ध्रुव जुरेलने यष्टिरक्षकाची भूमिका बजावली. खेळाच्या तिसऱ्या दिवशीही ऋषभ पंत मैदानावर आलेला नाही. ध्रुव जुरेल यष्टिरक्षण करत आहे. म्हणजेच पंत अजूनही तंदुरुस्त नाही. त्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरु झाल्यावर काय होणार याकडे साऱ्यांने लक्ष आहे.