India vs England, Yashasvi Jaiswal : उत्तर प्रदेश.. मुंबईचे मैदान... ते टीम इंडिया... यशस्वी जैस्वालचा संघर्षमयी प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. मुंबईच्या मैदानावर एका झोपडीत एकेकाळी राहणारा यशस्वी आज टीम इंडियाचा प्रमुख सलामीवीर बनला आहे... इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यशस्वीने गाजवली... ८०, १५, २०९, १७, १० व २१४* तीन कसोटी सामन्यांतील त्याची ही धावसंख्या... यशस्वीने राजकोट कसोटीत दुसरे द्विशतक झळकावून अनेक दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले. या सामन्यानंतर मुंबईच्या या खेळाडूला एक प्रश्न विचारला गेला, त्यावर त्याने मनं जिंकणारं उत्तर दिलं.
Record Breaker : यशस्वी जैस्वालने १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कधी न घडलेला विक्रम नोंदवला
१३ वर्षांचा असताना यशस्वी उत्तर प्रदेशहून आपलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. अथक मेहनतीने तो आज भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. त्याने ७ कसोटी सामन्यांत तीनवेळा १५०+ धावांची खेळी करून विक्रम केला. राजकोट कसोटीनंतर निक नाईटने त्याला एक प्रश्न विचारला. तू २२व्या वर्षी ३२ वर्षांचा असल्यासारखा मॅच्युअर कसा आहेस?
त्यावर यशस्वी म्हणाला,''भारतात, तुम्ही मोठं होता. तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी अथक परिश्रम घ्यावेच लागते. बस, ऑटो पकडण्यासाठीही, प्रत्येक गोष्टासीठा तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. मी हे लहानपणापासून करतोय आणि प्रत्येक इनिंग्जचे महत्त्व मला चांगलेच माहित्येय. त्यामुळे मी सराव सत्रात प्रचंड मेहनत घेतो आणि माझ्या देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी १०० टक्के देण्याचा माझा प्रयत्न असतो. ''
''पहिल्या डावात रोहित भाई आणि जड्डू भाई यांनी ज्याप्रकारे खेळी केली, त्यातून मला प्रेरणा मिळाली. कारण जिथे आवड असते, तिथे चर्चा होते, त्यांनी खरोखरच सत्रानुसार खेळायचे ठरवले होते आणि जेव्हा मी [ड्रेसिंग रूममध्ये] होतो तेव्हा मी विचार करत होतो की मी तिथे गेल्यावर मला तसाच खेळ करावा लागेल. ते ज्या प्रकारे खेळत होते त्यांनी आम्हाला प्रेरित केले, मला वाटते की त्यांना खूप मेहनत घेताना पाहणे हे अविश्वसनीय आहे,” असेही यशस्वीने म्हटले.
Web Title: Yashasvi Jaiswal was asked by Nick Knight saying how you're so mature at 22 as if you are 32. He says "In India, you have to work hard even to get into bus, train or auto."
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.