मोठा ट्विस्ट! WTC फायनलसाठी जैस्वाल इंग्लंडला जाणार; ऋतुराज गायकवाडची माघार, जाणून घ्या कारण

Yashasvi Jaiswal Team India : आयपीएल २०२३ मध्ये काही अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 11:14 AM2023-05-28T11:14:09+5:302023-05-28T11:15:04+5:30

whatsapp join usJoin us
 Yashasvi Jaiswal will be with the Indian team as a reserve player for the WTC final against Australia, while Ruturaj Gaikwad has withdrawn due to personal reasons  | मोठा ट्विस्ट! WTC फायनलसाठी जैस्वाल इंग्लंडला जाणार; ऋतुराज गायकवाडची माघार, जाणून घ्या कारण

मोठा ट्विस्ट! WTC फायनलसाठी जैस्वाल इंग्लंडला जाणार; ऋतुराज गायकवाडची माघार, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मध्ये काही अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. यातील एक नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल. आयपीएल २०२३ मध्ये या २१ वर्षीय फलंदाजाने शानदार कामगिरी करत शतक झळकावले. दरम्यान, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींपासून ते मोहम्मद कैफपर्यंत या दिग्गजांनी यशस्वीची टीम इंडियात निवड व्हायला हवी, असे मत व्यक्त केले होते. खरं तर आता माजी खेळाडूंचे मत सत्यात उतरले असून यशस्वी जैस्वाल पुढील महिन्यात होणाऱ्या WTC फायनलसाठी इंग्लंडला जाणार आहे.

मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने आगामी सामन्यातून माघार घेतली आहे, ज्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या ऋतुराज गायकवाडनेबीसीसीआयला सांगितले की, त्याच्या लग्नामुळे तो या काळात उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे गायकवाडच्या अनुपस्थितीत यशस्वी राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. 

टीम इंडियात 'यशस्वी' एन्ट्री

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वी जैस्वालचा राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. ३-४ जून रोजी लग्न असल्याची माहिती ऋतुराजने बोर्डाला दिली आहे. संघ व्यवस्थापनाने यशस्वीला लाल चेंडूने सराव करण्यास सांगितले आहे. त्याच्याकडे आधीच व्हिसा आहे. अशा स्थितीत तो येत्या काही दिवसांत इंग्लंडला रवाना होणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने आयपीएल २०२३ मधील १४ डावात ६२५ धावा केल्या होत्या.  

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 


 

Web Title:  Yashasvi Jaiswal will be with the Indian team as a reserve player for the WTC final against Australia, while Ruturaj Gaikwad has withdrawn due to personal reasons 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.