ICC Men's Player of the Month - February 2024 - ICC ने फेब्रुवारी महिन्याच्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्कारा भारताचा युवा स्टार यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) याला जाहीर केला. या पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन व श्रीलंकेचा पथूम निसंका यांचे आव्हान होते. पण, यशस्वीने यांना मागे टाकले. युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवली. तो या पुरस्कारासाठी स्ट्रॉंग स्पर्धक आहे. त्याने विशाखापट्टणम कसोटीत द्विशतक झळकावले होते आणि त्यानंतर राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतकी खेळी केली होती. या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या दिशेने तो कूच करत आहे. त्याने फेब्रुवारीमध्ये अनेक विक्रम रचले आणि राजकोटच्या खेळीदरम्यान एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार (१२) मारण्याच्या दीर्घकालीन कसोटी विक्रमाची बरोबरी केली.
२२ वर्षे आणि ४९ दिवसांच्या वयात सलग दोन दुहेरी शतकांमुळे तो सर डोनाल्ड ब्रॅडमन आणि विनोद कांबळी यांच्यानंतर कसोटीत दोन द्विशतके नोंदवणारा जगातील तिसरा सर्वात तरुण फलंदाज बनला. जैस्वालने फेब्रुवारी संपलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये २० षटकारांसह ११२च्या सरासरीने ५६० धावा केल्या. यशस्वी जैस्वाल म्हणाला, "आयसीसी पुरस्कार मिळवून मला खरोखरच आनंद झाला आहे. मी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ज्या प्रकारे खेळलो आणि 4-1 ने मालिका जिंकली त्याचा मला खरोखर आनंद झाला. माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत हा अविश्वसनीय अनुभव आहे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात केन विलियम्सन याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने पहिल्या कसोटीत दोन शतकं झळकावली आणि त्यानंतर हॅमिल्टन कसोटीच्या चौथ्या डावात नाबाद १३३ धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता. एकाच कसोटीत दोन शतकं झळकावण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. श्रीलंकेचा पथून निसंका हाही या शर्यतीत आहे. २५ वर्षीय फलंदाजाने नुकत्याच पार पडलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत १३९ चेंडूंत नाबाद २१० धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने १०१ चेंडूंत ११८ धावा केल्या आहेत. त्याने सनथ जयसूर्याचा २४ वर्षांपूर्वीचा वन डे क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडला.