महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. यष्टिंमागील चपळतेबरोबच धोनीच्या नेतृत्व कौशल्याची अनेक उदाहरणं दिली जातात. धोनी हा कॅप्टन कूल म्हणूनही ओळखला जातो, परंतु असे काही प्रसंग आहेत जेव्हा धोनीचा स्वतःवरील ताबा सुटल्याचे पाहायला मिळाले आहे. असाच एक प्रसंग मोहम्मद शमीसोबत घडला. मनोज तिवारी याच्यासोबत इंस्टाग्राम लाईव्हवर चॅट करताना शमीनं हा प्रसंग सांगितला.
Video : हरभजन सिंगला मारायला गेलो होतो, पण तो वाचला; Shoaib Akhtarचा धक्कादायक खुलासा
भारताच्या 2014च्या न्यूझीलंड दौऱ्यातील हा प्रसंग आहे, जेव्हा भर मैदानात धोनी शमीवर रागावला होता. या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेडन मॅक्यूलमनं 302 धावांची खेळी करून सामना अनिर्णीत राखला होता. या सामन्यात शमीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीनं किवी कर्णधाराचा झेल सोडला होता. तेव्हा तो 14 धावांवर खेलत होता आणि ती चूक भारताला महागात पडली. ''14 धावांवर मॅक्यूलमचा झेल सुटल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही त्याला लवकरच बाद करू. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत खेळला. त्यानंतर चहापानापर्यंत आणि संपूर्ण दिवस त्यानं खेळून काढला. त्यानंतर मी विराटला विचारलं तू का त्याचा झेल सोडलास?,'' शमी लाईव्ह चॅटवर तिवारीला हे सांगत होता.
सामन्याच्या चौथ्या दिवशी आणखी एका फलंदाजाचा झेल सुटल्यानंतर शमीचा राग अनावर झाला. त्यानंतर शमीनं बाऊंसर टाकला आणि तो यष्टिरक्षक धोनीच्या डोक्यावरून सीमापार गेला. ड्रेसिंग रुमकडे जाताना धोनी शमीजवळ आला आणि म्हणाला, झेल सुटल्यामुळे तुझा राग मी समजू शकतो, परंतु तुला तो अखेरचा चेंडू नीट टाकायला हवा होता. तेव्हा चेंडू हातातून सुटला, असं मी सांगितले. ''तेव्हा माही रागावला. तो म्हणाला, माझ्यासमोर अनेक लोकं आली आणि अनेक लोकं खेळून गेलीही. माझ्याशी खोटं बोलू नकोस. तुझा सीनियर आहे आणि तुझा कर्णधारही आहे. मला मूर्ख बनवू नकोस,'' असे शमी म्हणाला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ऑल टाईम IPL संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं निवडला संघ
कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी
ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerला भारतीय दिग्दर्शकाकडून चित्रपटाची ऑफर!
धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी
महाराष्ट्र पोलिसांप्रति Sachin Tendulkarनं व्यक्त केली कृतज्ञता; मानले आभार
टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?