नवी दिल्ली : सध्या सर्वत्र जगभर टी-२० विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. भारतीय संघ सातव्यांदा टी-२० विश्वचषकात सहभागी होत आहे. भारताचा सलामीचा सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध रविवारी होणार आहे. अवघ्या जगाचे लक्ष या बहुचर्चित सामन्याकडे लागले असतानाच बीग बी अमिताभ बच्चन यांनी देखील खास अंदाजात भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीच्या मंचावरून शायराना अंदाजात भारतीय संघाला साद घातली आहे. यावेळी पुन्हा विश्वचषक जिंका असे म्हणत बी बींनी रोहितसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या मंचावरून शायरी म्हणत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ये नीली जर्सी वाली म्हणत बीग बींनी भारतीय संघाला साद घातली आहे. तसेच भारतीय खेळाडूंचा उल्लेख त्यांनी १३० कोटी जनतेचं स्वप्न असा केला आहे. हे आव्हान मोठे असले तरी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २००७ च्या आठवणींना उजाळा द्या तो आनंद पुन्हा मिळवून द्या, ये नीली जर्सी वालो अशी साद बीग बींनी घातली आहे. तसेच त्यांच्या केबीसीच्या संपूर्ण टीमने देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. बीग बी अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सुपर-१२ फेरी गट १ - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड.
गट २ - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड, झिम्बाब्वे,
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न२७ ऑक्टोबर - भारत वि. नेदरलॅंड, १२.३० वाजल्यापासून, सिडनी३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून, पर्थ२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, १.३० वाजल्यापासून, ॲडलेड६ नोव्हेंबर - भारत वि. झिम्बाब्वे, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"