Rohit Sharma trolled by wife Ritika : वेस्ट इंडिजच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा सामना करण्यासाठी लखनौ येथे दाखल झाली आहे. गुरुवारपासून भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे आणि तीन सामन्यांची मालिका अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने मंगळवारी कसून सराव केला. कर्णधार रोहित शर्मासह इशान किशन, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि अन्य खेळाडूंनी नेट्समध्ये सराव केला. या मालिकेत रवींद्र जडेजा व बुमराह यांचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.
रोहित शर्माने सरावाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यावर त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हीने त्याला ट्रोल केले. रोहितने इंस्टाग्रामवर त्याचे काही फोटो पोस्ट केले आणि त्यावर Next Up असे लिहिले. पण, रितिकाचे त्याच्या खालीच कमेंट केली. तिने लिहिले, हे सर्व शानदार आहे, परंतु कृपया तू मला कॉल बॅक करशील का.
भारत-श्रीलंका यांच्यात (India vs Sri Lanka Head To Head) आतापर्यंत १९ ट्वेंटी-२० सामने झाले आणि त्यापैकी १३ भारताने जिंकले आहेत. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारत ११ पैकी ८ सामने जिंकला आहे. श्रीलंकेचा संघ नुकताच ऑस्ट्रेलियातून पाच सामन्यांची मालिका १-४ अशी गमावून आला आहे. दरम्यान, दीपक चहर व सूर्यकुमार यादव यांनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे.
भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान
सुधारित वेळापत्रकपहिली ट्वेंटी-२० - २४ फेब्रुवारी, लखनौदुसरी ट्वेंटी-२० - २६ फेब्रुवारी, धर्मशालातिसरी ट्वेंटी-२० - २७ फेब्रुवारी, धर्मशालापहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहालीदुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट), बंगळुरू