Join us

Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप पेक्षा IPL गाजलं! इथं पाहा Google सर्चमधील टॉप १० Sports Events ची यादी

गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत (Most Searched Sports Events On Google) आयपीएलनं (IPL) बाजी मारलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:07 IST

Open in App

Year Ender 2024, Sports Events on Google : भारतात क्रिकेटला तुफान प्रतिसाद मिळतो. २०२४ हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीनं खूपच भारी राहिलं. कारण टीम इंडियानं १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, टी-२० वर्ल्ड कपच्या वर्षातही IPL ची हवा झाली. गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत (Most Searched Sports Events On Google) आयपीएलनं (IPL) बाजी मारलीये.

चाहत्यांची उत्सुकता अन् IPL ट्रेंडमध्ये टॉपला

आयपीएल ही भारतातीलच नव्हे तर क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा झाली आहे. IPL मध्ये वेगवेगळ्या देशातील खेळाडूंचा सहभाग असतो. षटकार चौकारांची 'बरसात' अन् नव नवे रेकॉर्ड्स या स्पर्धेतील सामन्यात पाहायला मिळतात. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी कायपण असं म्हणत स्टेडियमवर होणारी गर्दी कमालीची असते. CSK चाहते धोनीसाठी देशभरातील मैदानात तुडूंब गर्दी करताना पाहायला मिळाले. हार्दिक, रोहित, सूर्यकुमार यादव, बुमराह यांच्यामुळे मुंबई इंडियन्सचा तर किंग कोहलीमुळे RCB चा एक वेगळाच चाहतावर्ग असल्याचे दिसून येते. टी-२० वर्ल्ड कपसारखा आयसीसी इवेंट याच वर्षी झाला. विशेष म्हणजे ही स्पर्धा भारतीय संघानं जिंकली. पण त्यातही सर्वाधिक सर्चच्या यादीत IPL ला पसंती देण्यात आली. त्यामुळे ही स्पर्धा आणखी मोठी झालीये अस म्हणायला हरकत नाही.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियानं केली हवा; टॉप ट्रेंडमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली स्पर्धा

IPL पाठोपाठ चाहत्यांनी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी उत्सुकता दाखवलेली दिसते. गूगल ट्रेंडमध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या स्पोर्ट्स इवेंटच्या यादीत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा ही दुसऱ्या स्थानावर आहे. युएई आणि अमेरिकेत रंगलेल्या स्पर्धेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. 

भारतीयांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेलाही दिली पसंती

टोकियो ऑलम्पिक स्पर्धेच्या तुलनेत पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी ढासळली. पण तरीही भारतीय क्रीडा प्रेमींनी जगातील मानाच्या स्पर्धेला टॉप ५ मध्ये मानाचे स्थान दिल्याचे दिसते. ही स्पर्धा सर्वाधिक गूगल सर्चच्या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिली.    ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाट प्रकरण चांगलेच गाजले. भारतीय महिला कुस्तीपटू  सर्वाधिक सर्च झालेल्या खेळाडूंच्या यादीत टॉपला राहिली. 

टॉप १० ट्रेंड स्पोर्ट्स इवेंटची यादी

  • इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 
  • टी-२० वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2024) 
  • ऑलिम्पिक (Olympic Games)
  • प्रो कबड्डी लीग  (Pro Kabaddi League)
  • इंडियन सुपर लीग (Indian Super League)
  • वुमन्स प्रीमिअर लीग (Women's Premier League 2024)
  • कोपा अमेरिका (Copa America 2024
  • दुलीप करंडक स्पर्धा (Duleep Trophy 2024 )
  • यूईएफए यूरो  (UEFA Euro)
  • अंडर १९ वर्ल्ड कप (ICC Under 19 World Cup 2024)
टॅग्स :आयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024प्रो कबड्डी लीगपॅरिस ऑलिम्पिक २०२४महिला प्रीमिअर लीगइयर एंडर 2024