इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ अखेरच्या स्थानावर आहे. असे असले तरी आतापर्यंतच्या सर्व सत्रात दिल्लीने तब्बल चार वेळा तळाचे स्थान गाठले आहे.
दिल्लीने २०११, २०१३, २०१४ आणि २०१८ साली अखेरचे स्थान गाठले होते. यंदा राजस्थानने १४ सामन्यात फक्त १२ गुण मिळवले आहेत. अखेरचे स्थान राखूनही हे आतापर्यंतचे सर्वात जास्त गुण आहेत. राजस्थानचा नेट रनरेटदेखील यंदा खुपच कमी -०.५६९ आहे.
दिल्ली प्रमाणेच किग्ज इलेव्हन पंजाबने देखील तीन वेळा तळाचे स्थान गाठले आहे. तर विराट कोहलीच्या आरसीबीने दोन वेळा तळाचे स्थान गाठले आतापर्यंत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी कधीही तळाचे स्थान गाठले नाही. तर त्याशिवाय सध्या आयपीएलमध्ये नसलेले कोची टस्कर्स, रायजींग पुणे सुपर जायंट्स, गुजरात लायन्स या संघाची कामगीरी देखील एवढीकधीही ढासळली नव्हती.
आयपीएल सत्रात अखेरचे स्थानी असणारे संघ
२००८ डेक्कन चार्जस२००९ कोलकाता नाईट रायडर२०१० किंग्ज इलेव्हन पंजाब२०११ दिल्ली डेअरडेविल्स२०१२ पुणे वॉरीयर्स इंडिया२०१३ दिल्ली डेअरडेविल्स२०१४ दिल्ली डेअरडेविल्स२०१५ किंग्ज इलेव्हन पंजाब२०१६ किंग्ज इलेव्हन पंजाब२०१७ रॉयल चँलेजर्स बंगलुरु२०१८ दिल्ली कॅपिटल्स२०१९ रॉयल चँलेजर्स बंगलुरू२०२० राजस्थान रॉयल्स