इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. २०२०चा आयपीएल यूएईत झाल्यानंतर आता भारतात होणाऱ्या आयपीएलची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू येथे आयपीएल २०२१चे सामने होणार आहेत. आयपीएलची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं मंगळवारी आयपीएल अँथम लाँच केलं. ( Star Sports unveils IPL 2021 official anthem). पण, त्यावरून नेटिझन्स ट्रोल करताना दिसत आहेत.
रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पहिला सामना रंगेल. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं बीसीसीआयनं आयपीएल २०२१ साठी सहा स्टेडियम्सची निवड केली आहे. यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा समावेश आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवला जाईल. अंतिम सामनादेखील याच मैदानावर होईल. २५ मे, २६ मे आणि २८ मे रोजी प्ले-ऑफचे सामने होतील. तर ३० मे रोजी अंतिम सामना रंगेल. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश नसेल. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.
पाहा IPL 2021 Anthem
नेटिझन्स करतायेत ट्रोल
Web Title: ‘Yeh apna mantra hai’ – Star Sports unveils IPL 2021 official anthem, Netizans trolled IPL badly, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.