Sarah Taylor: "होय, मी लेस्बियन आहे", इंग्लंडची माजी खेळाडू 'सारा' भावूक, टीकाकारांना दिले प्रत्युत्तर 

sarah taylor pregnancy: इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी खेळाडू सारा टेलर सध्या चर्चेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 01:03 PM2023-02-24T13:03:42+5:302023-02-24T13:04:26+5:30

whatsapp join usJoin us
 Yes I am a lesbian, beacuse  every family is different Former England cricketer Sarah Taylor slams trolls by tweet  | Sarah Taylor: "होय, मी लेस्बियन आहे", इंग्लंडची माजी खेळाडू 'सारा' भावूक, टीकाकारांना दिले प्रत्युत्तर 

Sarah Taylor: "होय, मी लेस्बियन आहे", इंग्लंडची माजी खेळाडू 'सारा' भावूक, टीकाकारांना दिले प्रत्युत्तर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

sarah taylor pregnancy england। नवी दिल्ली : इंग्लंडमहिला क्रिकेट संघाची माजी यष्टीरक्षक खेळाडू सारा टेलरने अलीकडेच आपल्या जीवनसाथीच्या गरोदरपणाची बातमी ट्विटरवर शेअर केली होती. त्यानंतर तिला खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला. पण काही ट्रोलर्सनी ती समलिंगी आहे असे म्हणून खिल्ली उडवली आणि तिला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. या ट्रोल करणाऱ्यांना सारा टेलरने ट्विटरवरूनच सडेतोड उत्तर दिले आहे. सारा टेलरने लेस्बियन असल्याची कबुली देत ​​एक भावनिक पोस्ट केली आहे. 

सारा टेलरने एक भावनिक पोस्ट करून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामध्ये तिने म्हटले, "माझ्या जोडीदाराच्या गरोदरपणाची घोषणा करताना विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील याचा मला अंदाज नव्हता. आशा आहे की मी काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन. होय, मी लेस्बियन आहे आणि खूप दिवसांपासून आहे. नाही, हा पर्याय नाही. मी प्रेमात असून मी आनंदी आहे. माझ्यासाठी हेच महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक कुटुंब वेगळे असते. ते कसे कार्य करते आणि दिसते यावर निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला पटवून सांगा. आम्ही आमच्या मुलाला खूप प्रेम देऊ." 

सारा टेलरने आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये लिहले की, "आम्ही सर्वजण वेगवेगळ्या समजुतींनी वेगवेगळ्या प्रकारे वाढलो. मी इतरांसोबत तुलना करत नाही. तसेच द्वेष आणि टीका करणार्‍या लोकांना मी हे सांगायलाच हवे की ते प्रेमाच्या जगाशी संबंधित नाहीत. जोपर्यंत तुम्ही आनंदी आहात आणि तुम्हाला कोण पाहिजे आहे तोपर्यंत प्रेम करत राहा. प्रेम आणि समर्थन पाठवलेल्या सर्वांचे आभार आणि प्रेम म्हणजे प्रेम." खरं तर सारा टेलरने 2019 मध्ये मानसिक आव्हानांचे कारण देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ती आपल्या देशातील अनेक क्रिकेट क्लबसाठी कोचिंग करताना दिसली आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title:  Yes I am a lesbian, beacuse  every family is different Former England cricketer Sarah Taylor slams trolls by tweet 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.