कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. स्पर्धाच होत नसल्यानं अनेक संघटना आणि फ्रँचायझी आर्थिक तोट्यात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून खेळाडूंच्या पगार कपातीचा निर्णय घेतला गेला आहे. अशात भारतीय फिरकीपटू आर अश्विनला सोमवारी मोठा धक्का बसला आहे. त्याचा करारच रद्द करण्याचा निर्णय संघानं घेतला आहे.
यॉर्कशायर कौंटी क्रिकेट क्लबनं सोमवारी तीन पदरेशी खेळाडूंचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. या तीन खेळाडूंमध्ये आर अश्विनचा समावेश आहे. त्याच्यासह दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पुरण याचाही करार रद्द करण्यात आल्याचे क्लबनं जाहीर केले. खेळाडू आणि क्लब यांनी सामंजस्यानं 2020च्या सत्रातील करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्लबचे संचालक मार्टिन मॉक्सॉन यांनी सांगितले की,''या काळात खेळाडूंनी जो समजुतदारपणा दाखवला, त्याचे मी सर्वप्रथम कौतुक करतो. कोरोना व्हायरसच्या संकटात आम्ही सातत्यानं खेळाडू आणि त्यांच्या एजंटशी संपर्कात होतो. ते अत्यंत व्यावयासिक आहेत. भविष्यात हे खेळाडू आमच्यासोबत पुन्हा दिसतील, अशी अपेक्षा आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...
KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य
युवराज सिंगचा मोठा खुलासा;'या' खेळाडूमुळे निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला!
फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू मागतोय माफी; म्हणतो दुसरी संधी द्या...
आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो!; 'कॉफी विथ करण' वादावर Hardik Pandya म्हणतो...
डेव्हिड वॉर्नरची 'बनवाबनवी'; पत्नीचा स्वीम सूट घालून TikTok Video
अभिमानास्पद ; शूजवर हातानं लिहायची Adidas; आता तोच ब्रँड Hima Dasसाठी बनवतो 'खास' शूज!
Video : युवराज सिंग Right-handed असता तर? स्टुअर्ट ब्रॉडची अशी धुलाई झाली असती
Web Title: Yorkshire County Cricket Club have confirmed that the contracts for R Ashwin this season have been cancelled by mutual consent svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.