मेलबोर्न : २०१८ मध्ये घडलेले चेंडू छेडखानी प्रकरण मोठी चूक होती. ते थांबविता आले असते. त्यासाठी मलाही दोषी ठरविता येईल, असे ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड सेकर यांनी म्हटले आहे.
या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया संघाच्या कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याच्या रणनीतीचे समीक्षण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व चेंडूची छेडखानी करणारा फलंदाज कॅमरन बेनक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पण सेकर यांच्या मते हे सामूहिक अपयश होते. सेकर म्हणाले, ‘निश्चितच त्यावेळी अनेक बाबी चुकीच्या घडल्या. त्यासाठी वारंवार दोषारोप करण्यात येते. ’