Join us  

तू कोण, याने फरक पडत नाही! रवी शास्त्री यांचे MI कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं विधान

इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक पाच जेतेपदपदं जिंकणारा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सध्या चांगल्या कामगिरीशी झगडताना दिसतोय....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 5:04 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक पाच जेतेपदपदं जिंकणारा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सध्या चांगल्या कामगिरीशी झगडताना दिसतोय.... आयपीएल २०२३ मध्ये त्याला १० सामन्यांत १८.४०च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत आणि MI प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. रोहित शर्माच्या कामगिरीबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही ( Ravi Shastri) त्यांचे प्रामाणिक मत मांडले आहे.  

राहुल द्रविडने ज्याला दिला निवृत्तीचा सल्ला, त्यानेच केलाय कल्ला! WTC Final मध्ये कमबॅकसाठी सज्ज

इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू असलेल्या रोहितने IPL 2023 च्या हंगामात केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. शनिवारी रोहितच्या मुंबई इंडियन्स संघाला चार वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने पराभूत केले. IPL 2023 मध्‍ये रोहितचा खराब फॉर्म त्याही सामन्यात कायम राहिला आणि एमएस धोनीच्‍या यलो ब्रिगेडविरुद्ध तीन चेंडूत शून्य धावा केल्या. 

आयपीएलमधील रोहितच्या कामगिरीबाबत बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटले की, एक कर्णधार या नात्याने तुमची कामगिरी प्रत्यक्षात येणे हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही धावा काढत असाल तर कर्णधार म्हणून काम खूप सोपे होईल. मैदानावरील देहबोली बदलते, ती मैदानावरील ऊर्जा वेगळी असते. ते पूर्णपणे वेगळे आहे. तुम्हाला धावा करता येत नसतील तर त्याचा उलट परिणाम होतो. मग तुम्ही कोण आहात याने काहीच फरक पडत नाही.

आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या

मौसम बिगडनेवाला है...! सर्व संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा Points Table

प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ? गुजरातचे 'वर्चस्व', मुंबईची डोकेदुखी वाढली; जाणून घ्या टक्केवारी

'गडबडीत उलटी पँट घालून मैदानात उतरलो'; वृद्धिमान साहाने सांगितले यामागचे नेमके कारण!

रोहितने यंदाच्या आयपीएलमध्ये १८४ धावा केल्या आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला १०पैकी ५ सामने जिंकता आले आहेत आणि ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. मुंबईचा पुढचा सामना मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध वानखेडेवर होणार आहे. “मुंबईचा संघ नवा आहे आणि २-३ वर्षांपूर्वी संघात असलेले मॅचविनर आता सोबत नाहीत. अशा परिस्थितीत आव्हान येते, तुम्ही पुढे कसे जाता? तुम्ही त्या समूहाला कसे प्रेरित करता? आपण संयोजन कसे तयार कराल? त्याच्यासाठी कर्णधार म्हणून आव्हाने दुप्पट झाली असतील. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत काम दुप्पटीने वाढले आहे,''असेही शास्त्री म्हणाले. 

 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मारवी शास्त्रीमुंबई इंडियन्स
Open in App