चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील नवव्या हंगामात भारतीय संघानं पाकचा बुक्का पाडला. टीम इंडियातील पराभवामुळे यजमान पाकला स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावलीये. दुबईच्या मैदानातील भारतीय संघाच्या दिमाखदार विजयाचे देशातील कानाकोपऱ्यात कानाकोपऱ्यात अगदी जल्लोषात सेलिब्रेशन करण्यात आले. भारत-पाक सामन्यातील मॅचनंतर चाहत्यांमधील माहोल बघण्याजोगा होता. भारतानं पाकचा बुक्का पाडल्यावर एका कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना सरप्राइजच दिले. ज्याची सोशल मीडियावर आता चांगलीच चर्चा रंगताना दिसते. जाणून घेऊयात भारत-पाक मॅचनंतर चर्चेत आलेला खास किस्सा
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतानं मॅच जिंकली, अन् बॉसन कर्मचाऱ्यांच मन
भारत-पाक मॅच म्हटलं की, अनेकजण काहीना काही बहाणा करत ऑफिसला दांडी मारायलाही मागे पडत नाहीत. काहींनी ऑफिसमध्येही काम थोड बाजूला ठेवून भारत-पाक मॅचचा आनंद घेतला. एवढेच काय भारतीय संघानं मॅच जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एका कंपनी मालकाने चक्क सोमवारी अर्धी सुट्टीच जाहीर करून टाकली. कॉलेज विद्या डॉट कॉमचे सह संस्थापक आणि सीईओ राहुल गुप्ता यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना भारतीय संघाचा विजयी आनंद साजरा करण्यासाठी हटके निर्णय घेतला.
लेट नाईट पार्टी करा, नीट झोप घ्या अन्.. भारत पाक लढतीनंतर बॉसचा मेसेज
भारत-पाक यांच्यातील लढत रविवारी २३ फेब्रुवारीला खेळवण्यात आली. भारतीय संघानं पाकला पराभूत करत स्पर्धेबाहेर काढलं. त्यानंतर देशभरात आनंदाचे वातावरण असताना कॉलेज विद्या डॉट कॉम या कंपनीच्या सीईओची लिंक्डइनची पोस्ट चर्चेत आलीये. या बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांना पार्टीसाठी तयार आहात ना! असं म्हणत सोमावरी सर्वांना हाफ डे दिलाय, अशी घोषणा करत सरप्राइज दिले.
बॉसचा हटके निर्णय चर्चेत
लेट नाईट पार्टी करा, नीट झोप घ्या अन् पहिल्या हाफमध्ये सुट्टी घेत दुसऱ्या हाफमध्ये कामावर या असा निर्णय घेत बॉसनं कर्मचाऱ्यांना खूश केलेच. पण बॉसचा हा अंदाज आता सोशल मीडियावरी चर्चेचा विषय ठरतोय. बॉस असावा तर असा, अशा आशयाच्या काही प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.