अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर जगभरात कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. त्याला क्रीडा विश्वातील अनेक दिग्गजांनीही पाठींबा दिला. क्रिकेटपटू डॅरेन सॅमी, ख्रिस गेल यांनीही क्रिकेटमध्ये असे प्रकार होत असल्याचा धक्कादायक दावा केला. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार सॅमीनं इंडियन प्रीमिअर लीगमध्येही ( आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद संघातून खेळताना वर्णद्वेषी टिप्पणीला सामोरे जावे लागल्याचा दावा केला. सनरायझर्स हैदराबाद संघातील खेळाडू आपल्याला 'कल्लू' म्हणून बोलवायचे, असे त्यानं सांगितले.
या शब्दाचा अर्थ त्याला माहीत नव्हता आणि आता त्यानं त्या खेळाडूंना मॅसेज करायला सुरूवात केली आहे, जे त्याला कल्लू म्हणून बोलवायचे. तो म्हणाला,''मी जगभरात अनेक लीगमध्ये खेळलो आणि मला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. अनेक खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर केला आहे. पण, जेव्हा मला त्या शब्दाचा अर्थ समजला, तेव्हा मला राग अनावर झाला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना मला त्या शब्दानं खेळाडू बोलवत होते. त्या शब्दानं कृष्णवर्णीयांचा अन्याय होतो, हे मला आता समजले.''
त्या नावानं सतत बोलावलं जायचं आणि सहकारी हसायचे, असेही तो म्हणाला.''मला त्या नावानं हाक मारणाऱ्या प्रत्येकाला मी मॅसेज केला आहे. तुम्ही मला त्या नावानं बोलवायचा, तेव्हा त्याचा अर्थ हा घट्ट नातं असं असेल मला वाटायचे. मला त्याचा अर्थ माहीत नव्हता. तुम्ही माझा अपमान करत होता. मी तुम्हाला मॅसेज केला आहे. मला तुम्ही नक्की कोणत्या हेतूनं त्या नावानं बोलवायचा? त्यामुळे मला उत्तर द्या. जर तुम्ही अनादर करत असाल, तर मला खूप वाईट वाटेल.''
Most Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं!
OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास!
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; इंग्लंड दौऱ्यासाठी ग्रीन सिग्नल!
Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!
मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय
Web Title: "You Guys Know Who You Are": Darren Sammy Alleges Racism Within SunRisers Hyderabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.