अबुधाबी : पुुुढील काही सामन्यात बाजी मारण्यासाठी संघाची मधली फळी भक्कम करण्याची गरज असल्याचे मत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने विजयानंतर व्यक्त केले.वॉर्नर म्हणाला, ‘फलंदाजी भक्कम करण्यासाठी मोहम्मद नबी याच्याऐवजी केन विलियम्सनला स्थान दिले. हा मोठा निर्णय होता. आघाडीच्या चार फलंदाजांनी चांगले योगदान द्यावे हा यामागील हेतू आहे. याशिवाय गोलंदाजांना प्रोत्साहन देत चांगले निकाल देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
आमच्यासाठी मधली फळी भक्कम करणे फारच गरजेचे आहे.’ बेयरस्टोसोबत सलामीला ७७ धावांची भागीदारी करणारा वॉर्नर पुढे म्हणाला, ‘आगामी सामन्यात बनीलादेखील संधी मिळू शकते.’ सामनावीर ठरलेल्या राशिदबद्दल कर्णधार म्हणाला, ‘सामना फिरवण्यासाठी नेमके काय करायचे याची राशिदला चांगली कल्पना आहे. युवा गोलंदाज अभिषेक शर्मा याच्यासोबतीने राशिदने सामन्यात रंगत आणल्यामुळे आनंद झाला.’
१७०-१८० धावा ठोकण्याच्या वाटेवर होतो. आमची मधली फळी कमकुवत असल्याच्या चर्चा ऐकायला येत आहेत. दिल्लीविरुद्ध आम्ही एकजुटीने खेळलो. प्रत्येकाला प्रोत्साहन देत लय मिळवली. त्या बळावर चांगल्या धावा उभारण्यात यश आले.
Web Title: You have to strengthen the middle board to win, devid warner
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.